नियम दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केली धाब्यावर ओली पार्टी; व्हिडिओ व्हायरल होताच मुख्याधिकाऱ्यांनी दिली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 07:35 PM2021-04-29T19:35:45+5:302021-04-29T19:36:12+5:30

निर्बंध झुगारून धाब्यावर ओली पार्टी करणाऱ्या नगरपंचायतीच्या चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

Alcohol party on the stage by the employees who showed the rules; As soon as the video went viral, the chief minister issued a notice | नियम दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केली धाब्यावर ओली पार्टी; व्हिडिओ व्हायरल होताच मुख्याधिकाऱ्यांनी दिली नोटीस

नियम दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केली धाब्यावर ओली पार्टी; व्हिडिओ व्हायरल होताच मुख्याधिकाऱ्यांनी दिली नोटीस

Next
ठळक मुद्देमुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी त्या चौघांना कारणे दाखवा नोटीसा गुरुवारी देऊन दोन दिवसात याचा खुलासा मागितला आहे. 

चाकूर : नगरपंचायतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता, स्वच्छता निरिक्षक,स्वच्छता विभागाचे लिपिक, स्वच्छताचे शहर प्रमूख या चौघांनी शहरालगत असलेल्या एका धाब्यावर बुधवारी दुपारी ओली पार्टी केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल नगरपंचायतीने घेतली आहे. मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी त्या चौघांना कारणे दाखवा नोटीसा गुरुवारी देऊन दोन दिवसात याचा खुलासा मागितला आहे. 

कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीचे आदेश लागू आहेत. शहरासह तालुक्यात कोरोना वाढत असल्याने संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना दिले आहेत. शासनाचे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपंचायतमधील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता प्रमोद कास्टेवाड, स्वच्छता निरीक्षक, अतिक्रमण प्रमूख व दिवाबत्तीचे मुकूंद मस्के, स्वच्छता विभाग लिपिक व्यंकट सूर्यवंशी, स्वच्छता व घनकचरा नियंत्रण शहर प्रमूख सचिन होळंबे हे बुधवारी शहरात फिरुन दुकाने, हॉटेल, धाबे आदी बंद करण्यासाठी दंडात्मक कारवाई करत होते. त्यानंतर चोघांनी शहरानजीक असलेल्या एका धाब्यावर जाऊन ओली पार्टी सुरु केली. या दरम्यान, अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालीद हरणमारे, अजित घंटेवाड हे त्या धाब्यावर गेले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतापाचा व्हिडिओ केला. पार्टीत मग्न कर्मचाऱ्यांचे त्याकडे लक्ष जाताच मिळेल त्या मार्गाने बाहेर पडत त्यांनी पळ काढला. मात्र, या घटनेची चित्रफित मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. 

दुकानदारांवर कारवाईचा बडगा उचलणारे हेच कर्मचारी सगळे नियम तोडून धाब्यावर ओली पार्टी करत असल्याचे पुढे आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबीत करण्याची मागणी अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालीद हरणमारे, अजित घंटेवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन आणि चित्रफित देऊन केली आहे. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना गुरुवारी पत्र पाठवून त्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे म्हटले आहे. 

ही घटना अत्यंत निंदनीय आहे. चौघांना कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत. नियमानुसार कारवाई करण्यात येईल. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. - अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत चाकूर

Web Title: Alcohol party on the stage by the employees who showed the rules; As soon as the video went viral, the chief minister issued a notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.