शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वेटलिफ्टिंगमध्ये 'आकाश'ची वजनदार कामगिरी; अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 16:18 IST

वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात आकाशच्या रूपाने नांदेड विद्यापीठाला प्रथमच सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

- महेश पाळणेलातूर : उत्कृष्ट लिफ्टिंग व स्नॅचचे वजनदार प्रदर्शन करीत लातूरच्या आकाश श्रीनिवास गौंड याने मोहाली येथील चंदीगड विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत २३४ किलो वजन उचलत सुवर्णकिमया साधली आहे.

लातूर शहरातील दयानंद कला महाविद्यालयात एम. ए. प्रथम वर्षात शिकणाऱ्या आकाश गौंडने नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करीत सुवर्णपदक पटकाविले आहे. अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत त्याने स्नॅच प्रकारात १०३ किलो, तर तीन ॲन्ड जर्क प्रकारात १३२ किलो असे एकूण २३५ किलो वजन उचलत स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. वेटलिफ्टिंग खेळात त्याने या स्पर्धेत जबरदस्त लिफ्टिंग करीत व स्ट्राँग स्नॅच मारत विरोधी खेळाडूंपेक्षा अधिक वजन उचलत ही सुवर्ण किमया केली आहे. त्यास प्रशिक्षक नीलेश जाधव, शुभम तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. विठलसिंह परिहार, प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, डॉ. पी. एन. देशमुख, क्रीडा विभागप्रमुख प्रा. अशोक वाघमारे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

विद्यापीठ स्थापनेनंतर या खेळात प्रथमच सुवर्णपदक...वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात आकाशच्या रूपाने नांदेड विद्यापीठाला प्रथमच सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. यापूर्वी विद्यापीठाच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंग प्रकारात रौप्य व कांस्यपदक पटकाविले होते. मात्र, यंदाच्या स्पर्धेत आकाशने सुवर्णझेप घेत नवा उच्चांक स्थापीत केला आहे.

राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतही किमया...आकाशने यंदाच्या वर्षात पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतही रौप्यपदक पटकाविले होते. यासह संघटनेतर्फे आयोजित खुल्या गटातील स्पर्धेत त्याने कांस्यही मिळविले होते. मात्र, विद्यापीठ स्पर्धेच्या माध्यमातून त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

ट्रेनरच्या माध्यमातून खुरकाचा खर्च...घरची परिस्थिती साधारण असल्याने कॉलेज करीत आकाश एका जिमवर ट्रेनर म्हणून काम करतो. त्यातून मिळणाऱ्या मानधनातून तो आपला खुराकाचा खर्च भागवतो. कुस्ती खेळाप्रमाणेच वेटलिफ्टिंगलाही खुराकाची गरज असते. जिमच्या मिळणाऱ्या मानधनातून तो आपला डायटचा खर्च भागवत त्याने यशोशिखर गाठले आहे.

टॅग्स :laturलातूर