महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयो
सलीम सय्यद, अहमदपूर
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी सप्ताहानिमित्ताने मौजे शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर) येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत रणधीर पाटील यांच्या शेतात बीजप्रक्रिया व बीबीएफ पेरणी प्रात्यक्षिक तसेच टोकन यंत्राने सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने व तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी सादर केले. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त करुन शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करून बीबीएफवर पेरणी करावी, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, प्रशांत भोसले, दयानंद पाटील, रणधीर पाटील, उपसरपंच प्रताप पाटील, बालाजी गुंडरे, कृषिसेवक सूर्यवंशी, घुमे, कृषी विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे बीबीएफ (सरी वरंबा) पद्धतीने आमदार बाबासाहेब पाटील यांनी पेरणी केली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी विकास अधिकारी चोले, उपविभागीय अधिकारी महेश तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, रणधीर पाटील उपस्थित होते.