शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
3
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
4
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
5
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
6
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
7
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
8
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
9
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
10
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
11
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
12
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
13
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
14
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
16
चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर
17
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
18
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
19
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
20
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
Daily Top 2Weekly Top 5

मोबदला दिल्यानंतर महामार्गाचे काम सुरु करा; पानगाव फाटा येथे शेतकऱ्यांचा रस्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 17:06 IST

शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्यावतीने पानगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले़

रेणापूर ( लातूर) : लातूर ते पानगावपर्यंतच्या महामार्गाचे काम सुरू असून ते काम रेणापूर फाट्यापर्यंत आले आहे़ यापुढील काम सुरु होत आहे़ पानगाव फाटा (खरोळा फाटा) ते पानगावपर्यंतच्या रस्त्यासाठी भूसंपादन करुन त्याचा मावेजा द्यावा़ त्याशिवाय, काम सुरु करु नये, या मागणीसाठी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी पानगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले़

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापूरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले़ यात विमलताई अकनगिरे, धनाजी भंडारे, पडिले, लिंबराज एलाले, नारायण वंगाटे, सुभाष जाधव, काकासाहेब कापसे, सूर्यकांत मोटेगावकर, परमेश्वर बरुळे, अजय चव्हाण, ज्ञानोबा कोंपल, बब्रुवान इस्ताळकर, विठ्ठल डोणे, काशिनाथ इस्ताळकर, जब्बार शेख, मनसूद शेख, शिवराज यादव, जयप्रकाश जटाळ, अभय येलाले, नागेराव जाधव आदी सहभागी झाले होते़

पानगाव फाटा (खरोळा फाटा) ते पानगावपर्यंतच्या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाला आहे़ लातूरपासून या रस्त्याचे काम सुरू होऊन रेणापूर फाट्यापर्यंत काम झाले आहे़ मात्र पानगाव फाटा (खरोळा फाटा) ते पानगावपर्यंत होणाऱ्या महामार्गासाठी भूसंपादन झाले नाही़ त्यामुळे महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्याचे शुल्क महामार्ग विभागाने भरुन मोजणी करावी़ महामार्ग होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्यावा़ शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पुढील काम होऊ देणार नाही, असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला़ लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे़

पानगाव फाटा येथे दोन तास आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन घेण्यासाठी तालुका प्रशासन व पोलिसांनी प्रयत्न केला़ परंतु, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी येऊन लेखी पत्र दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला़

टॅग्स :agitationआंदोलनlaturलातूरhighwayमहामार्ग