शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

12 दिवसांनंतर लातूरचा आडत बाजार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 17:46 IST

लातूर : ऐन सणासुदीच्या कालावधीत लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यांनी शेतमालाची खरेदी बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. शुक्रवारी सकाळी सभापती ललितभाई शहा यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत खरेदीदारांची समजूत काढण्यात आली. व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने शेतीमालाचे व्यवहार सुरु झाले.प्रस्तावित हमीभावाच्या कायद्यास विरोध दर्शवित राज्यातील बाजार समित्यांतील खरेदीदारांनी बेमुदत बंद ...

लातूर : ऐन सणासुदीच्या कालावधीत लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यांनी शेतमालाची खरेदी बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. शुक्रवारी सकाळी सभापती ललितभाई शहा यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत खरेदीदारांची समजूत काढण्यात आली. व्यापाऱ्यांनी सकारात्मकता दर्शविल्याने शेतीमालाचे व्यवहार सुरु झाले.

प्रस्तावित हमीभावाच्या कायद्यास विरोध दर्शवित राज्यातील बाजार समित्यांतील खरेदीदारांनी बेमुदत बंद पुकारला होता. त्यामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीही गेल्या अकरा दिवसांपासून बंद होती. परिणामी, शेतीमालाची खरेदी- विक्री ठप्प झाली होती. बैलपोळा, गौरी- गणपती असे सण तोंडावर आले असताना शेतमाल विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली होती. दरम्यान, ही कोंडी दूर करण्यासाठी बाजार समितीच्यावतीने प्रयत्नही झाले. शुक्रवारी सकाळी सभापती ललितभाई शहा यांच्या पुढाकाराने खरेदीदार, आडत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी खरेदीदारांना सध्याच्या कायद्याबद्दल माहिती देण्यात येऊन समजूत काढण्यात आली. खरेदीदारांनी सकारात्मकता दर्शविल्याने शेतमालाच्या व्यवहारास सुरुवात झाली.

पणन मंत्र्यांच्या बैठकीत प्रश्न मांडाशेतकऱ्यांची सध्या अडचण होत आहे. पणनमंत्र्यांनी खरेदीदारांची बैठक आयोजित केली आहे. त्या बैठकीत खरेदीदारांनी आपल्या समस्या मांडाव्यात. तोपर्यंत बाजारपेठ सुरु करावी. त्या बैठकीनंतर निर्णय घ्यावा, अशी समजूत काढल्याने आडत बाजार सुरु झाल्याचे ललितभाई शहा यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी