शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरवण्यासाठी एरोबिक्सची जोड; कोविड केंद्रावरील आशादायी दृश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:01 IST

विलगिकरण कक्षातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णासह कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या क्षमेतनुसार एरोबिक्स व प्राणायामाचे धडे

ठळक मुद्देप्रशिक्षक दीपक लोखंडे, विशाल सुरवसे यांचा धाडसी पुढाकार

- महेश पाळणे

लातूर : कोरोना झाला म्हणजे सगळेच गंभीर होतात, प्रकृती बिघडते असे नाही. सौम्य लक्षणे असणारे आणि लवकर बरे होऊन घरी जाणारे सर्वाधिक आहेत. असाच सुखद अनुभव बारा नंबर पाटीवरील कोविड केअर सेंटरवरील रुग्णांना येत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी दररोज सायंकाळी प्राणायामा बरोबर एरोबिक्स सुरू आहे. त्यासाठी प्रशिक्षक दीपक लोखंडे, विशाल सुरवसे यांनी धाडसी पुढाकार घेतला आहे. 

लातूर शहरातील १२ नंबर पाटी येथे असलेल्या कोविड सेंटरवर एरोबिक्स प्रशिक्षक दीपक लोखंडे व त्यांचे सहायक विशाल सुरवसे हे रविवारपासून विलगिकरण कक्षातील सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णासह कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या क्षमेतनुसार एरोबिक्स व प्राणायामाचे धडे सायंकाळच्या सत्रात देत आहेत. सायंकाळी ५ ते ६.३० वाजेच्या दरम्यान दीड तास संगीताच्या तालावर इझी एरोबिक्स व प्राणायामचे धडे रुग्णांना देत आहेत. रुग्णांचे मानसिक स्वास्थ वाढविणे, आनंद देणे व नैराश्य घालविण्यासाठी या थेरीपीचा आधार दिला जात आहे. यामुळे रुग्णांमधील भीतीदायक वातावरण कमी होण्यास मदत होत आहे. श्वसनाचा व्यायाम यातून उत्तमप्रकारे होत असून, इंडोरफीन हार्मोन या माध्यमातून जागृत होत आहेत. संगीताच्या तालावर व्यायाम असल्याने रुग्णांचेही मनोबल वाढत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम रुग्णांवर दिसत आहे. लहान मुलांसह, तरुण, वयस्कर असे जवळपास दीडशे रुग्ण यात सहभागी होत असून, या थेरपीमुळे रुग्णांना नवी ऊर्जा मिळत आहे. एकंदरीत या व्यायामामुळे फुफ्फुसाची गतिमानता वाढविण्यास मदत होत असून, हृदयाची कार्यक्षमता, श्वसनासंबंधी ऊर्जा व आनंदी वातावरण निर्माण होत आहे.

जिल्ह्यातील इतर कोविड सेंटरवर उपक्रम राबविण्याचा मानस... सुरुवातीच्या काळात व्यायामासाठी रुग्ण पुढे येत नव्हते. मात्र, प्रबोधन केल्यानंतर त्यांची संख्या हळूहळू वाढू लागली. जिल्हा प्रशासनानेही यासाठी पुढाकार घेऊन पाठबळ दिले. भविष्यात उर्वरित कोविड सेंटरवरही प्रशासनाच्या माध्यमातून एरोबिक्स आणि प्राणायाम सेंटर चालू करण्याचा मानस आहे. जेणेकरून रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मक उर्जा निर्माण होईल, असे प्रशिक्षक दीपक लोखंडे यांनी सांगितले.

उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून उपक्रमाचे कौतुक... जिल्हा प्रशासनाच्या मदतीने १२ नंबर पाटी येथील कोविड सेंटरमध्ये एरोबिक्स, प्राणायमचे धडे दिले जात आहेत. सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेल्या रुग्णासाठी सदरील उपक्रम फायदेशीर ठरत आहे. तर लक्षणे असलेल्या रुग्णांकडून हलकासा व्यायाम करून घेतला जात आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याने या उपक्रमाचे कोविड सेन्टरमधील रुग्णांकडून कौतुक होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर