जिल्ह्यात आणखी ९५७ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:26+5:302021-05-10T04:19:26+5:30

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी ९५७ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे बाधितांचा आलेख ८० हजार ...

Addition of 957 more patients in the district | जिल्ह्यात आणखी ९५७ रुग्णांची भर

जिल्ह्यात आणखी ९५७ रुग्णांची भर

Next

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी ९५७ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे बाधितांचा आलेख ८० हजार ९९२वर पोहोचला असून, यातील ६८ हजार ४६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १० हजार ९६८ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १,५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी उपचारादरम्यान २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी १,५५७ जणांची चाचणी करण्यात आली. त्यात ३२८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर २६१ अहवाल प्रलंबित आहेत. पूर्वीच्या २०९ प्रलंबित अहवालांपैकी शंभर बाधित आढळले आहेत. प्रयोगशाळेतील चाचणीत एकूण ४२८ पॉझिटिव्ह रुग्ण असून, २,२६२ जणांच्या रॅपिड अँटिजन चाचणीमध्ये ५२९ बाधित आढळले आहेत. या दोन्ही चाचण्या मिळून ९५७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी मयत झालेल्या २९ जणांपैकी १४ जणांचे वय हे ६० वर्षांपेक्षा जास्त होते. यातील एकामध्ये कोरोनासह अन्य आजार होते तर १४ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते. दरम्यान, उपचार घेत असलेल्या १०,९६८ रुग्णांपैकी ९७२ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ६६ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर असून, ४२० रुग्ण गंभीर बीआपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. १,८६१ रुग्ण मध्यम परंतु ऑक्सिजनवर आहेत तर ५४० रुग्ण मध्यम परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. ८ हजार ८१ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली. दरम्यान, उपचार घेत असलेल्या १०,९६८ रुग्णांपैकी ४,००७ रुग्ण विविध कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत तर ६,९६१ रुग्ण गृह अलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत.

१०८१ रुग्णांना मिळाली सुट्टी

प्रकृती ठणठणीत झाल्याने १,०८१ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात गृह अलगीकरणातील ७४३, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २१, सामान्य रुग्णालय, उदगीर येथील ५, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, गांधी चौक येथील १०, ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथील ६, ग्रामीण रुग्णालय, देवणी येथील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ७९, दापका कोविड केअर सेंटरमधील ६, कृषी पीजी कॉलेज, चाकूर येथील २२, बावची कोविड केअर सेंटरमधील ३, समाजकल्याण हॉस्टेल, कव्हा रोड येथील ५५ अशा एकूण १,०८१ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना रविवारी सुट्टी देण्यात आली.

Web Title: Addition of 957 more patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.