चिंताजनक आरटीपीसीआरमधील पॉझिटिव्हीटी ३७.६ टक्के...
मंगळवारी ४६८ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १७६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्हीटी रेट ३७.६ टक्के आहे. तर रॅपिड ॲन्टीजन टेस्ट १ हजार ७०५ व्यक्तींची करण्यात आली. त्यात ३८१ जण बाधित आढळले. या टेस्टमधील पाॅझिटिव्हीटी रेट २२.३ टक्के आहे.
२७२ जणांनी केली कोरोनावर मात...
जिल्ह्यात प्रकृती ठणठणीत झाल्याने २७२ जणांना सुटी देण्यात आली. यात होमआयसोलेशनधमील २४० जणांचा समावेश असून, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, अरुणा अभय औस्वाल अंध विद्यालय उदगीर येथील ३, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर ३, एक हजार मुला-मुलींचे वसतीगृह १२ नंबर पाटी येथील १२, मरशिवणी कोविड सेंटर २, समाजकल्याण वसतीगृह कव्हा रोड लातूर येथील ६, खाजगी रुग्णालय ४ अशा एकूण २७२ जणांनी कोरोनावर मात केली.