रिकव्हरी रेट ९२.९४ टक्के...
रविवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ४५३ जणांना रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सुटी देण्यात आली. यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३४, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ५, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, गांधी चौक लातूर येथील १६, ग्रामीण रुग्णालय औसा २, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर ५, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव २, ग्रामीण रुग्णालय कासारशिरसी १, एक हजार मुला-मुलींचे वसतिगृह १२ नंबर पाटी येथील १७, मुलांची निवासी शाळा औसा ६, दापका कोविड केअर सेंटर ११, कृषी पी.जी. कॉलेज चाकूर ७, बावची कोविड सेंटर ४, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतिगृह लातूर १०, जळकोट कोविड सेंटर २, खाजगी रुग्णालय ४ तर होमआयसोलेशनमधील ३२२ जणांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात रुग्णसंख्येचा आलेख कमी होत असून, बरे हाेण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९२.९४ टक्के आहे.