शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करुन लुबाडणाऱ्या टाेळीतील आराेपी जाळ्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: January 15, 2023 20:25 IST

दाेन गुन्ह्यांचा उलगडा : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर : एका माेटारसायकल चालकाला अडवत मारहाण करून लुबाडल्याची घटना लातुरात चार महिन्यांपूर्वी घडली हाेती. दरम्यान, याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. यातील तिघांपैकी एकाला पाेलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक चाैकशीत दाेन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

लातुरात मारहाण करुन एकाला लुबाडल्याच्या गुन्ह्यातील आराेपींचा शाेध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू हाेता. दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे १५ जानेवारी राेजी पथकाने अंकुश तानाजी जाधव (वय २१ रा. काेल्हेनगर, लातूर) याला ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, चार महिन्यांपूर्वी लातुरात एका माेटारसायकल चालकाला मारहाण करून माेबाइल हिसकावत पळ काढला हाेता. या गुन्ह्यात एकूण तिघांचा समावेश हाेता.

तसेच सुशील रमेश कांबळे (रा. कोल्हे नगर, लातूर) आणि विश्वजीत अभिमन्यू देवकते (रा. लातूर) यांचाही सहभाग असल्याची कबुली त्याने दिली. तिघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. ताब्यातील अंकुश जाधव याच्याकडून पळविलेला मोबाइलसह गुन्ह्यात वापरलेली माेटारसायकल पाेलिसांनी जप्त केली. गुन्ह्यातील अन्य दाेघांचा पाेलिस शाेध घेत आहेत. 

लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात सोमनाथ श्यामराव सुळके (वय २७, रा. भातखेडा) याला ताब्यात घेतले असून, त्याने शेतातील पाण्याची माेटार व स्टार्टर्स चाेरल्याचे चाैकशीत समाेर आले. कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक फौजदार संजय भोसले, अंमलदार अंगद कोतवाड, राम गवारे, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, राजू मस्के, जमीर शेख, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, प्रदीप चोपणे, नकुल पाटील यांच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी