लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणाऱ्या निलेश बापूराव मद्देवाड (२६ रा. खंडापूर ता. लातूर) या फरार आरोपीला गांधी चौक पोलिसांनी कोळपिंपरी (ता. धारुर जि. बीड) येथून रविवारी अटक केली़ त्याच्यासह आईविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेपासून निलेश पसार झाला होता. रविवारी त्याला अटक करण्यात आली़ लातूर तालुक्यातील खंडापूर येथील विवाहित तरुण निलेश बापूराव मद्देवाड याने शहरातील मजगे नगरातील एका सतरा वर्षीय मुलीला फूस लावून १३ जून २०१७ रोजी पळविल्याची घटना घडली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात निलेश मद्देवाड आणि छाया मद्देवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपीला अटक
By admin | Updated: July 4, 2017 04:35 IST