शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 22:19 IST

कारला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कार चालकाने प्रसंगावधान राखत स्वत:ला वाचिवण्यासाठी कार महामार्गाखाली नेली. हा अपघात एवढा भीषण होता, की एअर बॅगमुळे कारमधील भाविक बालंबाल बचावले...

चाकूर (जि. लातूर) : पंढरपूर येथून श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर नांदेडकडे निघालेल्या भाविकांच्या भरधाव कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघात आठ जण जखमी झाले. ही घटना नांदेड-लातूर महामार्गावरील अलगरवाडी पाटी येथे रविवारी दुपारी ३:३० वाजता घडली. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या कार चालकाने प्रसंगावधान राखत स्वत:ला वाचिवण्यासाठी कार महामार्गाखाली नेली. हा अपघात एवढा भीषण होता, की एअर बॅगमुळे कारमधील भाविक बालंबाल बचावले.

नांदेड येथील सागर नागठाणे (वय ३३), पांडुरंग रोडे (३५), रावसाहेब खल्लवाड (४५) हे एमएच ०२-बीझेड ५४२५ क्रमांकाच्या कारमधून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, रविवारी ते नांदेडकडे निघाले हाेते. त्यांची कार चाकूर शहराचा वळण रस्ता पार करून काही अंतर पुढे गेली असता, अचानक धावत्या कारचे टायर फुटले. यावेळी कार दुभाजक ओलांडत उजव्या बाजूच्या मार्गावर गेली. कार चालकाने प्रसंगावधान दाखवत कार थांबवली. दोन्हीही कारमधील प्रवासी जखमी झाले. यात दोन्ही कारचे माेठे नुकसान झाले.

मुखेड येथून कार (एमएच २६-सीपी ६१४४) लातूरच्या दिशेने जात होती. कारमध्ये महेश माधव कुदळे (वय २६), राजू सुरेश रणभिरकर (४३), सुनील सुरेश रणभिरकर (४१), रत्नाकर गंगाधर कळसकर (४३) आणि माधव इबितवाड (५६) हे जात होते. यावेळी पंढरपूर येथील देवदर्शनावरून नांदेडकडे जाणाऱ्या कारने (एमएच ०२-बीझेड ५४२४) चाकूर ओलांडले. यावेळी धावत्या कारचे टायर फुटले. चालकाने प्रसंगावधान राखत कारवर नियंत्रण मिळविले. मात्र, कार महामार्गाचे दुभाजक ओलांडून गेली. यावेळी मुखेड येथून लातूरकडे निघालेल्या कार चालकाने समोरून येणारी कार डाव्या बाजूला येत दुभाजक ओलांडून उजव्या बाजूला आल्याचे पाहिले. चालकाने अपघात टाळण्यासाठी कार महामार्गापासून पंधरा फूट खाली नेली अन् एका शेतात थांबली.

टॅग्स :Accidentअपघातcarकार