शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जीमहून परतणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; लातूर शहरात कार-मोटारसायकलची टक्कर

By राजकुमार जोंधळे | Updated: June 8, 2025 20:36 IST

अंबाजोगाई रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येताना मयुरबन काॅलनीकडे वळणारी कार आणि बुलेटची जोरदार धडक झाली.

राजकुमार जाेंधळे

लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील कॉक्सिट महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे मोटारसायकल आणि कारची टक्कर झाली. या भीषण अपघातात २३ वर्षीय नहुष राहुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर नरेंद्र अर्जुन जाधव (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत. नहुष आणि नरेंद्र हे दोघेजण जीमवरून परतत होते. अंबाजोगाई रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येताना मयुरबन काॅलनीकडे वळणारी कार आणि बुलेटची जोरदार धडक झाली. यात नहुष पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर नरेंद्र जाधव गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लातूरच्या गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमीच्या मेंदूला गंभीर इजा...जखमी नरेंद्र जाधव यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून, पाठीच्या मणक्याला आणि पोटाला जबर मार बसला आहे. प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. विश्रांत भारती यांनी सांगितले. दरम्यान, नरेंद्र यांचे काका ॲड. बळवंतराव जाधव म्हणाले, लातूर-अंबाजोगाई मार्गावर कारने मयूरबन कॉलनीकडे वळण घेतले. त्यापूर्वी एक कार निघून गेली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकाकडून बुलेटवरून येताना ही दुर्घटना घडली.

दुचाकीचा चक्काचूर; तासाभरात चालक ताब्यात...या अपघात दुचाकीचा समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी अंधार असल्यामुळे सीसीटीव्हीमध्ये नेमका अपघात कसा झाला, हे अद्यापि समजलेले नाही, असे पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी सांगितले. अपघातातील कार (एमएच २४ बीएक्स ९९९०) आणि चालकाला तासाभरात ताब्यात घेतले.

नहुष भाजपाचा पदाधिकारी...नहुषचे आई-वडील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. वडील राहुल पाटील हे भाजपाचे पदाधिकारी तर आई शितल माजी जि.प. सदस्य आणि सास्तूरच्या विद्यमान सरपंच आहेत. नहुष शिक्षणाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून लातूरमध्ये आहेत. त्यांचे शालेय शिक्षण संत तुकाराम शाळेत झाले असून, त्यांनी एमआयटी पुणे येथून पदवी शिक्षण पूर्ण केले होते. नहुष सध्या भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, तर जखमी नरेंद्र जाधव हे शिंदे सेनाचे युवा पदाधिकारी आहेत.

सास्तूरमध्ये अंत्यसंस्कार...अपघातातील नहुष पाटील यांच्यावर सास्तूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. लोहारा तालुका, सास्तूर परिसरातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तत्पूर्वी निधनाची वार्ता कळताच गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघात