शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नवरा अन् दीरमधील नववधूला फरकच समजला नाही; तब्बल ६ महिन्यानंतर लक्षात आलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:21 IST

लातूर - जुळे असल्याचा फायदा घेत दिराने भावजयीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी ...

लातूर- जुळे असल्याचा फायदा घेत दिराने भावजयीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिसांनी दोघा जुळ्या भावांना अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्न झालेल्या तरुणाला जुळा भाऊ आहे. त्या दोघांमध्ये कमालीचे साम्य आहे. त्यामुळे घरात आलेल्या २० वर्षीय नववधूला आपला नवरा आणि दीर काेणता यातील फरकच समजला नाही. जुळे असल्याचा फायदा घेत दिराने भावजयीवर अत्याचार केला. हा प्रकार तब्बल सहा महिन्यानंतर विवाहितेच्या लक्षात आला. माहेरी गेलेल्या विवाहितेला आणण्यासाठी जुळा दीर गेला असता, तिने नांदायला जाण्यास नकार दिला.

दरम्यान, यावर पीडितेच्या आई-वडिलांनी नांदायला न जाण्याचे कारण विचारले असता, घडलेला प्रकार तिने कथन केला. हा गंभीर प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पीडित मुलीला मानसिक आधार दिला. पीडित विवाहितेने लातुरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाेलिसांनी दोघा जुळ्या भावांना अटक केली आहे, असे लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगितले. तपास पोलीस उपनिरीक्षक निलकांते करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळlaturलातूरPoliceपोलिस