शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: April 12, 2025 05:33 IST

Latur News: लातूर-मुरुड महामार्गालगत एका वीटभट्टीवर जुनी ओळख म्हणून बाेरगाव काळे येथे जपून ठेवलेल्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. गावात दिमाखात उभी असलेली ट्रकची ओळख आता नाहीशी झाली आहे.

- राजकुमार जाेंधळे बोरगाव काळे (जि. लातूर) - लातूर-मुरुड महामार्गालगत एका वीटभट्टीवर जुनी ओळख म्हणून बाेरगाव काळे येथे जपून ठेवलेल्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. गावात दिमाखात उभी असलेली ट्रकची ओळख आता नाहीशी झाली आहे.

बोरगाव काळे येथे गोकुळदास मथुरादास राठी यांची लातूर-मुरुड महामार्गालगत सहा एकरावर वीटभट्टी आहे. हा व्यवसाय ते ४० वर्षांपासून करतात. त्यावेळी त्यांच्याकडे वीटभट्टीच्या कामासाठी जुन्या रॉकेट नावाने ओळख असलेले दहा ट्रक होते. त्यातील पहिला ट्रक (एम.पी.डब्लू २३०३) मॉडेल १९६३ हा ट्रक होता. २६ वर्षापूर्वी वीटभट्टी बंद पडल्याने गोकुळदास राठी यांनी दालमिल, आडत दुकान, होलसेल किराणा दुकान या व्यवसायामध्ये जम बसविला. कालांतराने वीटभट्टीसाठी घेतलेले काही ट्रक त्यांनी विक्रीसाठी काढले हाेते. मात्र, पहिला ट्रक जुनी ओळख म्हणून त्यांनी विक्री न करता वीटभट्टीवरच गत २५ वर्षांपासून जपून ठेवला हाेता. हाच ट्रक शुक्रवारी सायंकाळी पेट घेतल्याने जळून खाक झाला.

आमचा पहिला ट्रक; ओळख नाहीशी झाली...आमच्या घरात घेतलेले पहिले वाहन हा ट्रकच होता. त्यामुळे आम्ही जुनी ओळख म्हणून या ट्रकला वीटभट्टीवर शेड उभारून त्यामध्ये ठेवणार होतो. मात्र, शुक्रवारी ट्रकने अचानक पेट घेतल्याने आमची जुनी ओळख आज नाहीशी झाली आहे. - धीरज गोकुळदास राठी.

घटना उशिरा कळाली आणि ट्रक झाला खाक...गावालगत असलेल्या वीटभट्टीवरील जुन्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी पेट घेतला. ही घटना उशिरा कळाली. अग्निशामक दलाला फोन केला होता. मात्र, घटनास्थळी बंब दाखल हाेईपर्यंत ट्रक पूर्णत: जळून खाक झाला होता. - दीपक काळे, माजी चेअरमन.

टॅग्स :laturलातूरfireआग