शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कत्तलखान्याकडे पशुधन नेणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

By राजकुमार जोंधळे | Updated: July 31, 2023 19:11 IST

लातूर जिल्ह्यातील घटना : १५ बैलांसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर : जिल्ह्यातील पशुधनाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास अहमदपूर येथे पकडला असून, टेम्पोसह १५ बैल असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लातूर जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, पथक सोमवारी पहाटे अहमदपूर येथे पोचले असता, पथकाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पशुधनाची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी अडविले. टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यात १५ बैल (किंमत ७ लाख ५० हजार) आणि टेम्पो असा २२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टेम्पोत पशुधन कोंबून ते  कत्तलीसाठी अवैधरित्या नेले जात असल्याचे उघड झाले. यावेळी अधिक विचारपूस केली असता, सलमान उस्मान शेख (३०, रा. घाटनांदुर ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर), जावेद बुडन शेख (३०, रा. बोरगाव सारणी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि जाकीर अब्दुल अजीज शहा ( २३, रा. बोरगाव सारणी, ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) अशी नावे त्यांनी सांगितली आहेत. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील राहुल सोनकांबळे, मनोज खोसे, राहुल कांबळे तसेच अहमदपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांच्या पथकाने केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर