शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव पिकअपने दुचाकीला उडविले; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

By हरी मोकाशे | Updated: May 20, 2024 16:04 IST

लोहारानजीकची घटना, एकजण गंभीर जखमी

उदगीर : लोहारा गावाजवळ कुमठ्याकडे जाणाऱ्या वळणावर नळेगाव रोडहून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने रविवारी (दि. १९) रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांचा उपचारादरम्यान लातूर येथे मृत्यू झाला आहे.

याबाबत मृताच्या नातेवाइकांनी सांगितले, रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास लोहारा गावाजवळील चौकाच्या पलीकडे कुमठा गावाकडे जाणाऱ्या वळणावर नळेगावकडून उदगीरकडे येणाऱ्या पिकअपने (क्र. एमएच ११, बीएल ४७३७) दुचाकीस (क्र. एमएच २४, एएन ३९५६) जोराची धडक दिली. या अपघातात अथर्व विलास भंडारे (१५, रा. हाळी, ता. उदगीर), नवनाथ विठ्ठल बोडेवार (१७), आदिनाथ विठ्ठल बोडेवार (१९, दोघेही रा. अतनूर, ता. जळकोट) हे तिघे गंभीर झाले. 

दरम्यान, उदगीर ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले. उपचारादरम्यान अथर्व विलास भंडारे व आदिनाथ विठ्ठलराव बोडेवार या दोघांचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगितले. या अपघातप्रकरणी सोमवारी दुपारपर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद नसल्याचे बीट अंमलदार पडिले यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर