शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन

By हरी मोकाशे | Updated: June 29, 2023 19:29 IST

ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या पताके घेऊन टाळ- मृदंगांच्या गजरात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे नामस्मरण करीत येत होत्या.

डोंगरशेळकी : विठ्ठल- विठ्ठल जय हरी, श्री समर्थ धोंडूतात्या महाराज की जय अशा जयघोषात मराठवाड्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या समाधीचे आषाढी एकादशीनिमित्ताने दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी गुरुवारी मनोभावे दर्शन घेतले. भाविकांमुळे भक्तीचा मळाच फुलला होता.

पहाटे ५ वा. उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते महापूजा, आरती करण्यात आली. यावेळी वारकरी भक्तांमधून महापूजेचा मान पंडित पांडुरंग बिरादार या दांपत्यास मिळाला. यावेळी मंदिराचे विश्वस्त व्यंकटराव मुंढे, बाबुराव घटकार, पुजारी अनिल कुलकर्णी, चेअरमन हणमंतराव मुंढे, व्हा. चेअरमन प्रा. ज्ञानोबा गुरमे, भालचंद्र शेळके, मारोती मुंढे, ज्ञानोबा मुंढे, व्यंकटराव मरलापल्ले, हणमंत हंडरगुळे, गणेश मुंढे, तलाठी नकाते यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. दुपारी खा. सुधाकर शृंगारे, जिल्हा परिषदेेच माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी पूजा करुन आरती केली. यावेळी गणेश गायकवाड, बालाजी गवारे, उदयसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

अनवाणी पायांनी येऊन नतमस्तक...श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी भाविक अनवाणी पायांनी येत होते. तसेच मिळेल त्या वाहनांनी भाविक येत होते. उदगीर आगाराचे प्रमुख सतीश तिडके, अनिल पळनाटे यांनी भाविकांसाठी एसटीची सुविधा उपलब्ध केली होती. तसेच वाढवण्याचे पीएसआय मुरारी गायकवाड, सपाेनि. विठ्ठल गुरपदे यांच्यासह ४० पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर...उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. सुदाम बिरादार, डॉ. महेश वर्मा, गणेश मुंढे यांनी परिश्रम घेतले. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी उपकेंद्राच्या वतीने एक पथक नियुक्त करण्यात आले होते.

टाळ- मृदंगाचा गजर...ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या पताके घेऊन टाळ- मृदंगांच्या गजरात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे नामस्मरण करीत येत होत्या. भाविकांसाठी चहा पाण्याची सोय चंद्रकांत मुंढे, बालाजी नवलगीरे यांनी तर फराळाची व्यवस्था मंदिर समितीने केली होती.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीlaturलातूर