शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गावात दिवसभरातून येते एकाचवेळी बस; विद्यार्थ्यांना टपावरुन करावा लागतोय जीवघेणा प्रवास

By हरी मोकाशे | Updated: September 19, 2022 20:22 IST

लॉकडाऊननंतर आगाराने या मार्गावर दिवसभरातून केवळ एकच बस सुरु केली आहे.

लातूर : अहमदपूर तालुक्यातील कुमठा बु. व परिसरातील गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिरुर ताजबंद, अहमदपूरला दररोज जावे लागते. परंतु, या गावास सध्या एकच एसटी बस असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन बसच्या टपावरुन प्रवास करावा लागत आहे.

अहमदपूर तालुक्यातील कुमठा बु. छोटेसे गाव आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा असली तरी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिरुर ताजबंद अथवा अहमदपूरला जावे लागते. तसेच परिसरातील शिवणखेड, मोरतळवाडी, सय्यदपूर, वायगाव येथील विद्यार्थ्यांनाही माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी शिरुर, अहमदपूरला जावे लागते. कोविडच्या प्रादुर्भावापूर्वी शिरुर ताजबंद ते शिवणखेड अशी दर तास बस हाेती. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची सोय होत होती.

लॉकडाऊननंतर आगाराने या मार्गावर दिवसभरातून केवळ एकच बस सुरु केली आहे. उर्वरित बस बंद केल्या. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच नागरिकांना विविध कामांसाठी शिरुर, अहमदपूरला ये- जा करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. बहुतांशवेळा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांना दररोज खाजगी वाहनाने शाळेसाठी जाणे परवडत नाही. त्यामुळे गावात बस आली की बसमध्ये चढण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, बसमध्ये उभारण्यासाठीही जागा नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरुन टपावर बसून प्रवास करावा लागत आहे.

तात्काळ बस सुरु करावी...एकच बस असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. त्यामुळे गावासाठी किमान आणखीन एक बस सुरु करावी. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्रसिंह बयास यांनी सांगितले. यासंदर्भात तहसीलदार, आगारप्रमुखांना निवेदनही दिले आहे. दरम्यान, अहमदपूरचे आगारप्रमुख शंकर सोनवणे म्हणाले, या मार्गावर लवकरच बससेवा सुरु करुन विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यात येईल.

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षण