शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफचे ९६२ जवान देशसेवेसाठी सज्ज; शानदार दिक्षांत सोहळ्यात कवायती ठरल्या लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 19:38 IST

८० महिला जवानांचा समावेश : पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांच्या उपस्थितीत झाला सोहळा

लातूर : येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातील ९६२ जवानांचा शानदार दिक्षांत सोहळा सोमवारी सकाळी पार पडला. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल, प्रशिक्षण महानिदेशालय कार्यालयाचे पोलिस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रशिक्षण पुर्ण झालेल्या जवानांना कमांडट आर.के. सिंग यांनी शपथ दिली. त्यानंतर पथसंचलन पार पडले.

यावेळी जवानांनी मल्लखांब, कराटे, आपत्कालीन स्थितीतील उपाययोजनाचे प्रात्यक्षिक दाखविले. ४४ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर ९६२ जवान देशसेवेत दाखल झाले असून, यामध्ये ८० महिलांचा समावेश आहे. यावेळी प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजीव कुमार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, कमाडंट आर.के. सिंग, पी.के.सुधा, रणवीर सिंग, डी.व्ही.मारोती, पी.के. घोष यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात प्रशिक्षण केंद्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजीव कुमार म्हणाले, लातूर सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत ७ हजार ५९६ जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ४४ आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर ९६२ जवान देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत.

याप्रसंगी प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणारे नारायण प्रधान, संदेश जाधव, पल्लवी कुमारी, सुजित कुमार पांडा, मुकेश किंडो, कनकप्पा, पुष्पेंद्र कुमार, विक्रम सिंग कविया, व्यंकटेश कुरी यांचा गौरव करण्यात आला. परेडचे नेतृत्व नारायण चामे यांनी केले. सुत्रसंचालन विशाल कोरे व डॉ. निकिता नायडू यांनी मानले.

जवान कर्तव्य, सेवेचे पालन करतील...केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण महानिदेशालयाचे महानिरीक्षक राकेश कुमार यादव म्हणाले, देशातील सर्वात मोठ्या सैन्यदलात ९६२ जवान सहभागी होत आहेत. खडतर प्रशिक्षणानंतर हे जवान देशसेवेसाठी सज्ज झाले असून, आतंकवाद, नक्षलवाद संपविण्यासाठी कार्यरत राहतील. आपल्या सेवेच्या काळात जवान कर्तव्य व उद्देश सेवेचे पालन करतील, असेही ते म्हणाले.

लक्षवेधी कवायतीचे सादरीकरण...सीआरपीएफच्या दिक्षांत समारोहात जवानांनी कराटे, मल्लखांब, काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतूक केले. दिक्षांत समारोहासाठी विविध राज्यातून जवानांचे कुटूंबिय उपस्थित होते. यावेळी महिलांच्या टीमनेही प्रात्यक्षिक सादर केले.

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिस