शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

धाडसी चोरी! डोळ्यांत मिरचीची पूड टाकून व्यापाऱ्याचे ९ लाख पळविले

By हरी मोकाशे | Updated: February 24, 2023 18:35 IST

या धाडसी व जबरी चोरी प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत

देवणी (जि. लातूर) : नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री शहरातील एका व्यापाऱ्याने दुकान बंद करुन दिवसभरात जमा झालेले ९ लाख ५ हजार रुपये घेऊन पायी घराकडे जात होते. तेव्हा अज्ञात दोघांनी त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून सदरील रक्कम पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात दोघा अज्ञाताविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवणी पोलिसांनी सांगितले, येथील बसस्थानकासमोर उमाकांत जगदीश जीवने (रा. देवणी) यांचे कापडाचे दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ९ वा. च्या सुमारास दुकान बंद केले. तत्पूर्वी दिवसभर व्यवहारात जमा झालेले ९ लाख ५ हजार रुपये एकत्र करुन बॅगेत ठेवले. त्यानंतर ते पैशाची बॅग घेऊन बसस्थानकाच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या घराकडे जात होते. बस स्थानकाची संरक्षक भिंत ओलांडून पलिकडील अरुंद रस्त्यावर पोहोचले असता एका अज्ञात तरुणाने त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून त्यांच्या हातातील ९ लाख ५ हजारांची बॅग हिसकावली आणि पळ काढला.

दरम्यान, त्या अज्ञात चोरट्याचा साथीदार बाजूच्या रस्त्यावर दुचाकी चालू करुन थांबला होता. बॅग घेऊन आलेल्यास विनाविलंब दुचाकीवर बसवून दोघेही मुख्य रस्त्यावरुन पसार झाले. याप्रकरणी उमाकांत जीवने यांच्या फिर्यादीवरून देवणी ठाण्यात दोघा अज्ञाताविरुध्द शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे करीत आहेत.

तपासासाठी तीन पथके...या धाडसी व जबरी चोरी प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. निलंग्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कोल्हे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली. तसेच तपासासाठी सूचना केल्या. तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

संशयित ठिकाणांची पाहणी...चोरट्यांच्या शोधासाठी शुक्रवारी दिवसभर शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाहणी करण्यात आली. तसेच संशयित ठिकाण व व्यक्तींची झाडाझडती करण्यात आली. दिवसभर पोलीस उपनिरीक्षक नारायण डपटवाड, पोहेकॉ. विनायक कांबळे, गणेश बुजारे, सुग्रीव कोंडामंगले, सय्यद शौकत, अभिजीत डोईजड, नरेश उस्तुरगे, देविदास किवडे हे तपास करीत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी