शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

जीप-कंटेनरच्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

By admin | Updated: July 17, 2016 23:39 IST

अहमदपूरहून उदगीरकडे चाललेल्या जीपला समोरून आलेला कंटेनेरने जोरदार धडक दिली. यात सात जण जागीच ठार तर एकाचा उदगीरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १७ - अहमदपूर-उदगीर राज्य मार्गावरील कल्लूरनजीक (ता. उदगीर) झालेल्या जीप-कंटेनरच्या भीषण अपघातात आठ प्रवासी ठार, तर १३ जखमी झाले. यातील चौघे गंभीर आहेत. हा अपघात रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास झाला. सर्व जखमींना उदगीरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रवी माणिकराव बिरादार (४५), कैलास जगन्नाथ बिरादार (२४), संदीप श्रीमंतराव पाटील (२९, सर्व रा. रायफळी, ता. बसवकल्याण, कर्नाटक), प्रवीण निजलिंगे (२५ रा. उत्ता, ता. भालकी, कर्नाटक), सलीम हाबीब दायमी (४५, रा. उदगीर), नेहा सलीम दायमी (१५, रा. उदगीर), जौस रफिक शेख (चालक, वाढवणा बु. ता. उदगीर) अशी मृतांची नावे असून, आठव्या मृताची ओळख पटली नाही. लक्ष्मीबाई माधव जाधव (रा. एकुर्का रोड), दशरथ नागोराव वाघमारे (५०, रा. उदगीर), राजकुमार माणिकराव बिरादार (२२, रा. रायफळी, ता. बसवकल्याण) आणि राजकुमार श्रीमंत हलशेट्टे (२५, रा. मुचळंब, ता. भालकी) हे चौघे गंभीर जखमी आहेत. अहमदपूरहून उदगीरकडे २१ प्रवासी घेऊन भरधाव वेगाने निघालेली ही क्रुझर जीप (एम. एच. २० ए. जी. ६७१७) व उदगीरहून अहमदपूरकडे निघालेल्या कंटेनर (एम. एच. ०४ ई. ९६०६) यांच्यात कल्लूरनजीक रविवारी रात्री समोरासमोर हा भीषण अपघात झाला. यात जीपचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. जीपमधील सात प्रवासी जागीच ठार झाले. जखमी प्रवाशांना उदगीर येथील ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले असून, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघात होताच कल्लूर, इस्मालपूर आणि वाढवणा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने बाहेर काढले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़. अहमदपूरहून उदगीरकडे निघालेल्या क्रुझर जीपमध्ये २१ प्रवासी खचाखच कोंबले होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात माधव दगडू जाधव (दोघे रा़ एकुर्का रोड), नामदेव दत्तात्रय शिंगडे (३२, इस्मालपूर), नरसिंग धोंडिबा सोनवणे (३५, शेल्हाळ), सना सलीम दायमी (१४), शमशाद बेगम दायमी (३६ रा़ उदगीर), राकेश नेताजी मादळे (१८ रा़ उदगीर), बालाजी झटु कांबळे (३५ रा़ शेल्हाळ), गणेश काशिनाथ लोहार (२०, कुंदेसिरसी, ता़ भालकी, जि़ बीदर), लक्ष्मण व्यंकटप्पा बिरादार (२९, रायफळी ता़ बसवकल्याण) हे नऊ जण जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.