शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७० वर्षीय वृद्धेचा अत्याचारानंतर खून; ३ दिवस मृतदेह घरात ठेवून नराधम छतावर झोपला

By राजकुमार जोंधळे | Updated: August 27, 2024 18:27 IST

वृद्धेचा मृतदेह साडीत बांधून घरात ठेवला, तीन दिवसांनी घटना उघडकीस; ३५ वर्षीय आरोपीला अटक

लातूर : ७० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याची घटना साेमवारी भेटा (ता. औसा) येथे घडली. याबाबत ३५ वर्षीय आराेपीला अटक केली असून, भादा ठाण्यात गुन्हा नाेंद केला आहे. या घटनेने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील एका गावात वयोवृद्ध महिला मुलासह वास्तव्याला आहे. परिसरातील भेटा, भादा येथील लोकांच्या घरात घरकाम करून उदरनिर्वाह चालवित हाेती. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ती घरातून बाहेर पडली. मात्र, संध्याकाळी घरी परतलीच नाही. दरम्यान, वयोवृद्ध महिला भेटा येथे आली असता, मन्सूर सादिक व्होगाडे (वय ३५) याने त्या महिलेला घरात बोलावून घेतले. वयोवृद्ध महिलेचे हात-पाय बांधून अत्याचार केला. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला. मृतदेह खोलीतील लोखंडी रॉडला साडीत बांधून ठेवला. मयताच्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशीही सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. साेमवारी सकाळी गावात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याची चर्चा सुरू हाेती. चर्चा कानी पडल्यानंतर फिर्यादी मुलासह नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. हा मृतदेह फिर्यादीच्या आईचा असल्याची ओळख पटली. भादा पोलिसांनी एका आराेपीला अटक केली. याबाबत मयत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून भादा पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस अधीक्षक मुंडे यांनी दिली भेट...भादा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सोमय मुंडे, औसा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी भेट देऊन पाहणी केली.

पुण्यावरून आलेल्या आरोपीच्या आईने उघडला घराचा दरवाजा...आरोपी मन्सूर व्होगाडे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. त्याच्या या वागण्याने आई, पत्नी त्याच्याजवळ राहत नाहीत. भाऊ दुसऱ्या गावी राहताे. एकटाच राहणारा आराेपी हा घटनेनंतर तीन दिवस पत्र्यावर झोपत होता. साेमवारी सकाळी त्याची आई पुण्याहून परतली. तिने घराचा दरवाजा उघडला आणि घटना उघड झाली.

अप्पर पोलिस अधीक्षकांनी काढली गावकऱ्यांची समजूत...घटनेनंतर दोन्ही गावांतील लोकांमध्ये तीव्र संताप आहे. आरोपीला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ