शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांच्या ८ कंपन्यांचे ६४ नमुने अप्रमाणित; विक्री बंदचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 13:51 IST

खरीप हंगाम : कृषी विभागाकडून ३७३ नमुन्यांची तपासणी

- हरी मोकाशेलातूर : शेतकऱ्यांना योग्य दरात दरात दर्जेदार बियाणे मिळावे म्हणून कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, गत दोन महिन्यांत जिल्ह्यात ३७३ बियाणांचे नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेमार्फत तपासण्यात आले. त्यात ८ कंपन्यांचे ६४ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने २५ दुकानांना सदरील कंपन्यांचे बियाणे विक्री करू नयेत, असे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात खरिपाचे साधारणत: ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत जवळपास १५० मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे २ लाख ३० हजार ३७९ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असून १ लाख ८३ हजार ६६५ हेक्टरवर आहे. दरम्यान, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि योग्य दरात बी-बियाणे, खते, औषधे मिळावीत म्हणून कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले.

शासनाने यंदाच्या एप्रिल व मे महिन्यात बी-बियाणांचे ३४८ नमुने घेण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्या तुलनेत जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने एकूण ३७३ नमुने घेतले होते. हे नमुने तपासणीसाठी परभणीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, ६४ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सदरील बियाणे विक्री करणाऱ्या २७ कृषी सेवा केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या तर २५ दुकानांना सदर बियाणे विक्री न करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ३७ दुकानांवर खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तसेच खताचे १७८ नमुने घेण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पुण्याच्या खत विश्लेषण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यात ७ कंपन्यांचे १५ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. त्यामुळे तीन दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ५ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

कायद्यानुसार कारवाई केली जाणार...जिल्ह्यात बियाणे दुकानदार १ हजार ४०, खत दुकानदार ९४० तर, कीटकनाशक विक्री केंद्र ७९६ आहेत. शेतकऱ्यांना चांगली बियाणे, खते मिळावीत म्हणून कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रांची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. बियाणे, खत कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरagricultureशेती