शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उघडीप, निलंगा तालुक्यातील सोयाबीनचे ६० टक्के नुकसान

By संदीप शिंदे | Updated: August 31, 2023 18:20 IST

१०० गावात रॅन्डम सर्वे; कृषी, विमा कंपनीचा प्राथमिक पाहणी अहवाल

औराद शहाजानी : गेल्या महिनाभरापासून तालुक्यात पावसाने उघडीप दिली असून, खरीपातील पिके हातातून गेली आहेत. शासनाने पावसाचा २१ दिवसांचा खंड असल्यास रॅन्डम सर्वेक्षण करुन २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाला आदेशित केले आहे. त्यानुसार तालुक्यातील ३ मंडळातील १०० गावात कृषी विभाग व पिकविमा कंपनीकडून करण्यात आलेल्या पाहणी खरीप पिकांचे ६० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

निलंगा तालुक्यातील तीन कृषी मंडळातील व दहा महसूल मंडळातील १०० गावातील ३ हजार ९४७ हेक्टर सोयाबीनचा रॅन्डम सर्वे करण्यात आला. यात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. निलंगा, औराद व कासार शिरसी अशी तीन कृषी मंडळ आहेत. यात दहा महसुल मंडळे असून, यामध्ये औराद, हलगरा, कासार बालकुंदा, निलंगा, मदनसुरी, भूतमुगळी, कासारशिरसी, अंबुलगा, निटूर, पानचिंचोली या महसूल मंडळातील प्रत्येकी दहा गावाप्रमाणे शंभर गावे रॅडम पद्धतीने निवडण्यात आली होती. तालुक्यात ६९ हजार ५११ हेक्टवर साेयाबीन पेरा करण्यात आला आहे.

कृषी, विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात...ऑगस्ट महिना काेरडा गेल्याने खरीप पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. शासनाने कृषी विभाग व विमा प्रतिनिधी यांना संयुक्त नुकसानीची पाहणी करून २५ टक्के नुकसान भरपाई पहिल्या टप्प्यात देण्यासाठी प्रक्रिया राबवण्यासाठी आदेशित केले हाेते. याप्रमाणे निलंगा तालुका कृषी अधिकारी अनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी सुनील घारोळे, आर.एम. राठोड यांच्यासह सहा कृषी पर्यवेक्षक, ३६ कृषी सहाय्यक, दहा विमा कंपनीचे प्रतिनिधी या टीमने २२ ते ३० ऑगस्टदरम्यान शेतात जाऊन रॅडम नुकसानीचा सर्वे केला. यात प्राथमिक अंदाजाप्रमाणे सोयाबीनचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकारी अनिल शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसlaturलातूर