शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही हरभरा हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ

By हरी मोकाशे | Updated: June 22, 2023 19:40 IST

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात.

लातूर : हरभरा खरेदीसाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ९६८ शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री केला. उर्वरित ५ हजार ५३९ शेतकरी केंद्राकडे आलेच नाहीत. या शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी आणावा म्हणून केंद्र चालकांनी पाठपुरावा केला. मात्र, शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळतो. दरम्यान, गत पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला होता.

नाफेडच्या वतीने जिल्ह्यात १५ फेब्रुवारी ते ११ जून या कालावधीत हरभरा खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. तत्पूर्वी हरभरा विक्रीसाठी जिल्ह्यातील २४ हजार ५०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मात्र १८ हजार ९६८ शेतकऱ्यांनी हरभरा विक्री केली आहे.

१४५ कोटींचा हरभरा खरेदी...नाफेडच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यात जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत १८ हजार ९६८ शेतकऱ्यांचा २ लाख ७२ हजार ८३७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केलेला हरभरा हा १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार ४४५ रुपये किमतीचा आहे.

दीड कोटी रक्कम थकीत...हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या १८ हजार ९६८ शेतकऱ्यांपैकी १८ हजार ८१४ शेतकऱ्यांना १४४ कोटी १३ लाख ६७ हजार ६२० रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अद्यापही १५४ शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख ७७ हजार ८२५ रुपये थकीत राहिले आहेत. ११ जूनपासून हमीभाव खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहेत.

बी-बियाणे, खते खरेदी करणे कठीण...खुल्या बाजारपेठेत कमी भाव असल्याने आम्ही हमीभाव खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री केली. हरभरा विक्री करून जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, अद्यापही रक्कम मिळाली नाही. खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदी करणे कठीण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर...यंदाच्या हंगामात जिल्ह्यात १८ हजार ९६८ शेतकऱ्यांचा २ लाख ७२ हजार ८३७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्याची रक्कम १४५ कोटी ५७ लाख ४५ हजार आहे. १५४ शेतकऱ्यांचे १ कोटी ४३ लाख थकीत राहिले आहेत. ते लवकरात लवकर मिळावेत म्हणून पाठपुरावा सुरू आहे. तसेच जवळपास साडेपाच हजार शेतकऱ्यांनी केंद्रावर हरभरा विक्री केला नाही. त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.- विलास सोमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी