सोयाबीनची ३ हजार ५०९ क्विंटलची झाली आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:55+5:302021-06-18T04:14:55+5:30

लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ३ हजार ५०९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ७ हजार २०० ...

3,509 quintals of soybean was imported | सोयाबीनची ३ हजार ५०९ क्विंटलची झाली आवक

सोयाबीनची ३ हजार ५०९ क्विंटलची झाली आवक

Next

लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ३ हजार ५०९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ७ हजार २०० रुपयांचा कमाल, ६ हजार ६०० रुपयांचा किमान तर ६ हजार ९१० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला.

यासोबतच बाजार समितीमध्ये गुळ ४३७, गहू ११२५, हायब्रीड ज्वारी १५, रब्बी ज्वारी ४९१, हरभरा ७ हजार २८३, तूर २ हजार ९१६, करडई ४५ क्विंटलची आवक झाली. गुळाला ३ हजार २७५, गहू १८००, हायब्रीड ज्वारी १७००, रब्बी ज्वारी १७५०, हरभरा ४ हजार ५६०, तूर ६ हजार ३००, करडई ४ हजार ६०० तर सोयाबीनला ६ हजार ९१० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला.

बाजारात सद्यस्थितीत शेती मालाची आवक घटली असून, सोयाबीनच्या दरातही काही प्रमाणात घट झाली आहे. हरभऱ्याची आवक वाढलेली असून, गुरुवारी ७ हजार २८३ क्विंटल हरभऱ्याची आवक झाल्याचे बाजार समितीने सांगितले.

Web Title: 3,509 quintals of soybean was imported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.