एक एसटीला वर्षातून चार वेळा होणार कोटिंग...
राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यालयामार्फत खासगी एजन्सीमार्फत कोटिंग करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक एसटीला वर्षातून चार वेळा कोटिंग होणार आहे. त्यानुसार संबंधित एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. अँटी मायक्रोबियल कोटिंग या कोटिंगमुळे संसर्ग पसरत नाही .
बाधित व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही, पण बाजूला बसल्यास?
बाधित व्यक्ती एसटीमध्ये प्रवास करत असल्यास त्याच्यापासून पसरणारे विषाणू एसटीत पडले तरी इतरांना त्याची बाधा होणार नाही. परंतु प्रवासी दुसऱ्या प्रवाशाच्या बाजूला बसल्यास बाधा होऊ शकते. त्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. सध्या हल्ली अनेक प्रवासी आणि वाहक, चालकही मास्क वापरताना दिसत नाहीत.
प्रवासी म्हणतात.....
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला कोरोना प्रतिबंधात्मक कोटींग करण्यात आले आहे. मंडळाचा उपक्रम प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. प्रवाशांनीही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे बसमध्ये चढता उतरताना गर्दी न करता शिस्त पाळावी अंतर राखावे आणि मास्क वापरणे गरजेचे आहे. सध्या रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे अनेकांना मास्कचा विसर पडला आहे. परंतु सध्या पूर्णपणे कोरोना गेलेला नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे.
कोट
लातूर आगारामध्ये ११० बसेस आहेत. त्यापैकी ७५ बसेसना कोटिंग पूर्ण झाले आहे. मंडळ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबवित आहे. तरीही प्रवाशांनी मास्क वापरावा. आमचे वाहक-चालकही मास्क वापरतात. ऑटी मायक्रोबियल कोटिंगमुळे फायदा होणार आहे. दर दोन महिन्याला किंवा वर्षातून चार वेळा प्रत्येक बसला कोटिंग केले जाणार आहे.
जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक, लातूर