शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपासाठी ३ लाख २१ हजार मतदार १८ प्रभागातून ७० सदस्य निवडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:20 IST

कोणत्या प्रभागात किती मतदार हक्क बजावणार हे निश्चित झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत.

लातूर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून एकूण १८ प्रभागातून ७० सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी एकुण ३ लाख २१ हजार ३५४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक विभागाकडून मतदारांची अंतिम यादी जाहिर करण्यात आली आहे. कोणत्या प्रभागात किती मतदार हक्क बजावणार हे निश्चित झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. आचारसंहिता घोषित होताच मनपाकडून शासकीय पोस्टर्स, फलक झाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांनी आता जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सण, उत्सव, जयंती, वाढदिवस आदी कार्यक्रमातून निवडणुकीची साखर पेरणी करणाऱ्यांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले होते. निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांनी तातडीने आपापल्या प्रभागात भेटी सुरू केल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी अगोदरच इच्छुकांचे अर्ज घेतले आहेत. त्यात भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक असलेल्या जवळपास ९०० उमेदवारांनी मुलाखतीही दिल्या आहेत. काँग्रेसने अर्ज घेतले असून त्यांच्या मुलाखती काँग्रेस भवन येथे १७ व १८ डिसेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे), वंचित बहुजन आघाडी, एएमआयएमनेही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांकडून उमेदवारी मागणीचे अर्जही भरून घेण्यात आले आहेत. काही प्रभागात नवीन इच्छुकांची संख्या वाढली असल्याचे पाहून पक्षांतरही होत आहेत.

२० डिसेंबरपूर्वी बूथनिहाय मतदार निश्चित होणार...लातूर शहर महापालिका निवडणुकीत १८ प्रभाग आहेत. येथून ७० सदस्य निवडून येणार आहेत. यासाठी प्रभाग क्रमांक एक, चार, आठ आणि नऊ या चार प्रभागात २० हजारांवर मतदारांचा समावेश आहे. १५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्याने कोणत्या प्रभागात किती मतदार हक्क बजावणार हे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाकडून २० डिसेंबरपूर्वी बुथनिहाय मतदार संख्या निश्चित केली जाणार आहे.

जाहिरात फलक हटविण्याचे काम...महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहिर होताच महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या हद्दीत असलेले शासकीय कामाचे फलक, पोस्टर हटविण्याचे काम हाती घेतले आहे. २४ तासांत तब्बल २३० पेक्षा अधिक फलक, पोस्टर काढण्यात आले आहेत. काही ठिकाणचे फलक झाकण्यात येत असून काही ठिकाणी काढूनच टाकले जात आहेत.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक...महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात चार झोनमध्ये प्रत्येकी एक असे उपजिल्हाधिकारी दर्जाचे ४ अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निश्चित केले आहेत. तसेच त्यांना सहाय्यक म्हणून तहसीलदार, मनपाचे दोन अधिकारी निवडण्यात आले आहेत. मंगळवारी या अधिकाऱ्यांची पहिली बैठक झाली आहे.

कोणत्या प्रभागातून किती मतदार...

प्रभाग क्रमांक. मतदार१ - २०,३१०

२ - १८,६२६३ - १७८२०

४ - २०,२४८५ - १६,९८६

६ - १७,०८५७ - १७,९८६

८ - २०,५९४९ - २०,५५३

१०-  १९,२४०११ - १७,५४३

१२ - १९,३२९१३ - १७,७७१

१४ - १६८८६१५ - १७,८४१

१६ - १५,४२७१७ - १४,६३४

१८ - १२,४७५एकूण मतदार : ३ लाख २१ हजार ३५४.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Municipal Corporation Elections: 3.21 Lakh Voters, 70 Members

Web Summary : Latur Municipal Corporation elections are heating up. 3.21 lakh voters across 18 wards will elect 70 members. The final voter list is out, and candidates are actively campaigning. The model code of conduct is in effect, with authorities removing unauthorized posters.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६