शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपा निवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचारी, उमेदवारी अर्जांसाठी ६ ठिकाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:10 IST

२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री-स्वीकृती सुरू होणार आहे. 

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनपाने जवळपास अडीच हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय, उमेदवारांची गैरसोय होणार नाही, यासाठी वेगवेगळ्या २२ कक्षांची स्थापना करून कामाची विभागणी केली आहे. प्रत्येकी तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यासाठी १८ प्रभागांसाठी ६ निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांची कार्यालयेही निश्चित झाली आहेत. त्याच ठिकाणी उमेदवारी अर्ज भरावा लागणार असल्याची माहिती मनपा आयुक्त मानसी मीना यांनी पत्रपरिषदेत दिली. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्री-स्वीकृती सुरू होणार आहे. 

मतदारांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर आता मतदान केंद्र निश्चिततेचे काम सुरू आहे. शिवाय, आचारसंहिता कक्ष, खर्च नियंत्रण, स्थिर निगराणी पथक, भरारी पथक यासह प्रचारसभा, रॅलींसाठी चित्रीकरण करणारी टीमही नियुक्त केली आहे. लातूर शहरातील अंबाजोगाई रोड, बार्शी रोड, औसा रोड, बाभळगाव रोड, नांदेड रोड अशा पाच ठिकाणी स्थिर निगराणी पथक असणार आहे. पत्रपरिषदेस अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त वसुधा फड, डॉ. पंजाब खानसोळे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांची उपस्थिती होती.

शासकीय तंत्रनिकेतन येथे स्ट्राँगरूममनपा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतदान यंत्राची साठवणूक तसेच स्ट्राँगरूम बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे उभारली जात आहे. यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, मतदान यंत्रे घेऊन जाण्यासाठी लागणारी वाहनेही निश्चित केली जात आहेत.

ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्जमनपा निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे सहा ठिकाणी त्यांना निश्चित करून दिलेल्या प्रभागातील उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. यामुळे गर्दीही होणार नाही. आरक्षित जागेवर अर्ज दाखल करताना सोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. किंवा अर्जासाठी दाखल केलेले कागदपत्र जोडून सहा महिन्यांत त्याची पूर्तता करणे बंधनकारक असल्याचे आयुक्त मानसी मीना म्हणाल्या.

सूचक, अनुमोदक वॉर्डातलाचउमेदवारांना अर्ज दाखल करीत असताना सूचक, अनुमोदक हे आपल्याच प्रभागातील असणे आवश्यक आहे. सूचक, अनुमोदकासमोर मतदार यादीतील क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे. दुसऱ्या प्रभागातील सूचक, अनुमोदक चालणार नाहीत. मतदार यादीतील नाव व क्रमांक शोधण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीचे सॉफ्टवेअर असल्याचे सांगण्यात आले.

स्वीप कक्षाची स्थापनामनपाच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी स्वीपअंतर्गत जनजाजगृती मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावा, यासाठी मोहीम राबविली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Municipal Corporation Election: Staff Deployed, Application Centers Set Up

Web Summary : For the Latur Municipal Corporation election, 2,500 employees are appointed. Six centers established for application submissions. Offline applications accepted with caste validity if applicable. Awareness campaigns planned to increase voter turnout. Strongroom established at Government Polytechnic.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६