बरे हाेण्याचे प्रमाण ९७.२६ टक्क्यांवर...
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९० हजार ७८९ नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. यातील ८८ हजार ३०० रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. रुग्णांचा बरे हाेण्याचे प्रमाण ९७.२६ टक्क्यांवर आहे. नागरिकांनी मास्क वापरावे, सतत हात स्वच्छ धुवावे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
६ लाख ३१ हजार २८२ चाचण्या...
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ३१ हजार २८२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ९० हजार ७८९ जणांना काेराेनाची बाधा झाली. यातील पाॅझिटिव्हिटी रेट १४.४ असून, आतापर्यंत एकूण ८८ हजार ३०० रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. सध्याला लातूर जिल्ह्यात ५४ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत, असेही आराेग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.