८८७ जणांनी घेतली को-व्हॅक्सिन लस
को-व्हॅक्सिन लसीचा गुरुवारी पुरवठा झाला. त्याचा वापरही सुरू झाला असून, ४५ वर्षांपुढील वयोगटात पहिल्याच दिवशी ७८७ जणांनी ही लस घेतली. तर ६० वर्षांपुढील ६ हजार २५६ जणांना तसेच सहव्याधी असलेल्या ४५ ते ६० वयोगटांतील ८०४ जणांना को-व्हॅक्सिन लस देण्यात आली.
मनपाच्या वतीने लसीकरण
महानगरपालिकेच्या वतीने ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात आली. पटेल चौकातील नागरी आरोग्य केंद्र, राजीव नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, औषधी भवन तसेच विलासराव देशमुख आयुर्विज्ञान केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर या ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा प्रारंभ महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या उपस्थितीत औषधी भवन येथे करण्यात आला. यावेळी लातूर केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे रामदास भोसले, ईश्वर बाहेती व मनपाचे पदाधिकारी उपस्थित होते.