शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पदभरतीच्या शुल्कापोटी लातूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत दीड कोटी

By हरी मोकाशे | Updated: September 6, 2023 18:20 IST

विविध ४७६ जागांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज दाखल

लातूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील ४७६ जागांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज ऑनलाईनरित्या दाखल झाले आहेत. विशेषत: पदभरतीच्या शुल्कापोटी जिल्हा परिषदेच्या खात्यावर १ कोटी ६१ लाख रुपये जमा झाला आहेत. आता उमेदवारांचे परीक्षेकडे लक्ष लागून आहे.

विविध कारणांमुळे बऱ्याच महिन्यांपासून राज्यातील जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे युवकांचे लक्ष लागून होते. दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. लातूर जिल्हा परिषदेतील ४७६ पदांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज दाखल झाले आहेत. विशेषत: उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याचे पहावयास मिळत आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे निवड परीक्षा कधी होते याकडे लक्ष लागून असल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, या भरतीसाठी १९७ दिव्यांगांचे तर ३०९ माजी सैनिकांच्या पाल्याचे अर्ज दाखल झाले आहेत. १० हजार ६९४ जणांनी परीक्षेसाठी लातूर हे केंद्र निवडले आहे तर ७ हजार ४८ जणांनी परजिल्ह्यातील केंद्र निवडले आहे.

नियमित जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पहा...जिल्हा परिषदेच्या ४७६ जागांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. परीक्षेसंदर्भात उमेदवारांना कळविले जाणार नाही. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी नियमितरित्या जिल्हा परिषदेचे संकतेस्थळ पहावे. त्यावरच सूचना करण्यात येणार आहेत.- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

एका जागेसाठी ३८ अर्ज दाखल...गट क मधील जागांसाठी ही पदभरती होणार आहे. साधारणत: एका जागेसाठी जवळपास ३८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), लघुलेखक, विस्तार अधिकारी अशा काही पदांसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. पदाच्या शुल्कापोटी जिल्हा परिषदेच्या खात्यावर १ कोटी ६१ लाख रुपये जमा झाले आहेत.

आदेश मिळताच त्या उमेदवारांना पैसे परत...सन २०१९ मध्ये जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, परीक्षा न झाल्याने शासनाकडून ६५ टक्के पैसे उपलब्ध झाले आहेत. उर्वरित ३५ टक्के रक्कम येणे शिल्लक आहे. यासंदर्भात शासनाकडून आदेश येताच त्या १० हजार ९२ उमेदवारांना पैसे परत करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज...संवर्ग - पद संख्या - अर्ज संख्याआरोग्य पर्यवेक्षक - ०३ - ६४आरोग्य सेवक (पु.)- २२ - २८४४आरोग्य सेवक (हंगामी) - १०५ - ४८३७आरोग्य परिचारिका - २४६- १२९४औषध निर्माण अधिकारी - ०७- ५६१कंत्राटी ग्रामसेवक - ०४ - ९४५कनिष्ठ अभियंता (स्था.)- २४ - १७३९कनिष्ठ अभियंता (वि.) - ०१ - ४४६कनिष्ठ आरेखक - ०३- ४४कनिष्ठ यांत्रिक - ०१- २७कनिष्ठ लेखा अधिकारी - ०२- १४४कनिष्ठ सहाय्यक - ०४- २६७कनिष्ठ सहाय्यक लेखा - ०५- ४४२मुख्य सेविका - १० - १९२९पशुधन पर्यवेक्षक - २३ - ४५०प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ०१ - ५०लघलेखक - ०१ - ९०विस्तार अधिकारी (सां.) - ०४- ८६३स्थापत्य अभियांत्रिकी सहा. - १० - ७०१एकूण - ४७६ - १७७४२ 

टॅग्स :laturलातूरzpजिल्हा परिषद