शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:45 IST

मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली.

लातूर : मध्यान्ह भोजनाच्या खिचडीतून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील मंगरुळ  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारी घडली आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांवर वाढवणा (बु़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत़

जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे़ पटसंख्या २२० आहे़ नेहमीप्रमाणे आज दुपारी विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करण्यात आली़ ती खाल्ल्यानंतर काही वेळांनी १४१ विद्यार्थ्यांना जुलाब, उलट्या, पोटदुखणे असा त्रास होऊ लागला़ काही विद्यार्थ्यांनी ही माहिती शिक्षकांना दिली तर काहींनी घरी जाऊन पालकांना दिली़ त्यामुळे गावचे सरपंच महेताब बेग यांच्यासह पालकांनी तात्काळ या विद्यार्थ्यांना उपचारासाठी वाढवणा (बु़) (ता़ उदगीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून त्यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे़ उर्वरित १३१ विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़

१० जणांची प्रकृती गंभीरजुलाब, उलटी, पोटदुखी असा त्रास होणारे मंगरुळ येथील १४१ विद्यार्थी दाखल झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर आहे़ खिचडीतील आळ्यामुळे हा त्रास होण्याची शक्यता आहे़ अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, असे वाढवणा बु़ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़ वर्षा कानवटे व डॉ़ जी़पी़ भारती यांनी सांगितले

खिचडीत आळ्या असल्याचा आरोपविद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीत आळ्या होत्या़ त्यामुळेच विद्यार्थ्यांना हा त्रास झाला़ या घटनेची चौकशी करुन स्वयंपाकी, मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सरपंच महेताब बेग यांच्यासह पालकांनी केली आहे़

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीfood poisoningअन्नातून विषबाधा