लातूर, उदगीर, औशातून सर्वाधिक अर्ज
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लातूर, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर तालुक्यातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अवैध ठरलेल्या नामनिर्देशनपत्रांमध्ये लातूर तालुक्यातील २५, रेणापूर २, औसा २२, निलंगा १७, देवणी १९, शिरूर अनंतपाळ ३, उदगीर १०, जळकोट ५, अहमदपूर २०, तर चाकूर तालुक्यातील ४ नामनिर्देशनपत्रांचा समावेश आहे. ३० डिसेंबर रोजी सर्वाधिक ६ हजार ४४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
३ हजार ३७५ सदस्यांची होणार निवड
निवडणुकीच्या माध्यमातून ३ हजार ३७५ सदस्यांची निवड केली जाणार आहे. लातूर तालुक्यातील ५९२, रेणापूर २२८, औसा ४३०, निलंगा ४२८, देवणी १०७, शिरूर अनंतपाळ २२९, उदगीर ५४३, जळकोट २१७, अहमदपूर ३८५, तर चाकूर तालुक्यातील २१६ सदस्यांचा समावेश आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.