शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा काेटींची रक्कम वाचली! तिजोरीच्या चाव्या चोराला बँकेतच भेटल्या, त्याने प्रयत्न केला पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 18:16 IST

लातुरात साेलापूर सिद्धेश्वर बँक फाेडण्याचा प्रयत्न फसला

लातूर : शहरातील गुळ मार्केट परिसरात असलेल्या साेलापूर सिद्धेश्वर बँकेचे शटर ताेडून प्रवेश करत, बँकेची तिजाेरी फाेडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. ही घटना बुधवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील गूळ मार्केट परिसरात साेलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेची शाखा आहे. तिजाेरीमध्ये जवळपास १ काेटी २५ लाखांची राेकड हाेती. बुधवारी पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास चाेरट्याने बँकेच्या शटर व चॅनल गेटचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. दरम्यान, बँकेतील तिजाेरीची चावी घेऊन ती उघडण्याचा प्रयत्न केला. तिजाेरीला दाेन चाव्या लावल्याशिवाय उघडता येत नाही. चाेरट्याने बराच वेळ प्रयत्न करूनही तिजाेरी उघडली नाही. त्यामुळे चाेरट्याने तेथून काढता पाय घेतला. या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. चाेरट्याने अंगामध्ये जरकीन व ताेंडाला बांधून आत प्रवेश केल्याचे ३.५७ वाजता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. बँक फाेडण्याचा प्रयत्न किमान दाेन ते चार चाेरट्यांनी केला असावा, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत बँकेच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वानपथक जाग्यावरच घुटमळले...घटनास्थळी अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, सकाळी श्वानपथक बाेलावण्यात आले मात्र, ते जाग्यावरच घुटमळले. शिवाय, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले हाेते. चाेरट्यांच्या शाेधासाठी पाेलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

तिजाेरीच्या चाव्या बँकेतच...बँक बंद झाल्यानंतर तिजाेरीच्या चाव्या संबंधितांनी सुरक्षितपणे ठेवण्याची गरज हाेती. मात्र, त्या चाव्या बँकेतच ठेवण्यात आल्या हाेत्या. बँकेतील दैनंदिन घडामाेडींची माहिती घेत चाेरट्याने हा प्रयत्न केल्याचे समाेर आले आहे. बँकेतच ठेवलेल्या चावीने तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ताे फसल्याने जवळपास सव्वा काेटींची रक्कम वाचली. विशेष म्हणजे बँक सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे या घटनेवरुन समाेर आले आहे. - जितेंद्र जगदाळे, पाेलीस उपविभागीय अधिकारी, लातूर

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर