येथील कोविड रुग्णालयात मंगळवारी आरटीपीसीआर तपासणीत ५३ बाधित आढळले. अँटिजेन तपासणीत ५३ कोरोनाबाधित आढळले आहेत. यशस्वी उपचारानंतर ११ जणांना घरी सोडण्यात आले. कोरोनाबाधित ८ रुग्णांचा आणि नॉन कोविड चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सध्या कोविड रुग्णालयात ६८, होम आयसोलेशनमध्ये १६३, तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ६४, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर संस्थेत ४३, पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे ३४, तोंडार पाटी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ३५, जयहिंद मुलांचे वसतिगृह येथे ३० आणि उदगीर शहरातील मंजूर असलेल्या खासगी कोविड रुग्णालयात ९७ अशा एकूण ५३४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.