शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील २२ हजार शेतकऱ्यांसाठी १० कोटी

By संदीप शिंदे | Updated: April 12, 2023 21:00 IST

लातूर जिल्ह्यातील १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लातूर : जिल्ह्यात मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामातील पिके, फळबागा आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करीत मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार १० एप्रिल रोजी महसूल व वनविभागाने जिल्ह्याला १० कोटी ५६ लाख ५५५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. लवकरच ही मदत जिल्हा प्रशासनास प्राप्त होणार असून, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

मार्च महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. यामध्ये रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई, द्राक्ष, टरबूज, खरबूज, आंबा, पपईसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर सहा पशुधन आणि एका शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात दुपारी गारपीट झाल्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे केले होते. यामध्ये २२ हजार ५६५ शेतकऱ्यांचे १० हजार ३६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार शासनाकडे १० कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. शासनाने त्यास प्रतिसाद देत १० एप्रिल रोजी जिल्ह्याला १० कोटी ५६ लाख ५५ हजार रुपयांच्या निधी जाहीर केला आहे. संपूर्ण राज्यासाठी १७७ कोटी रुपये असून, मराठवाड्यासाठी ८४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी आहे. दरम्यान, हा निधी जिल्हा प्रशासनास लवकरच प्राप्त होणार असून, निधी मिळताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा...जिल्ह्यात मागील दोन दिवसांपूर्वी निलंगा आणि देवणी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्ष आणि टरबूज पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या नुकसानीचेही पंचनामे पूर्ण करण्यात येत आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाल्यावर प्रशासनाने तातडीने अहवाल शासनाकडे सादर करून निधी मिळविला. त्याचप्रमाणे दोन दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी देवणी आणि निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी