शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १ हजार २३१ प्रकरणांत तडजाेड; लातूर जिल्ह्यात एकूण ४० पॅनलद्वारे झाले कामकाज

By राजकुमार जोंधळे | Updated: November 13, 2022 18:46 IST

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १ हजार २३१ प्रकरणांत तडजाेड झाली आहे. 

लातूर : येथील जिल्हा व सत्र न्यायालय, तालुका न्यायालयांत शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत झाली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष सुरेखा कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या लोक अदालतीत तब्बल १ हजार २३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक न्यायालय व ग्राहक मंच प्रकरणे, भूसंपादन, लवाद, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे, कलम १३८ एन.आय. ॲक्टची प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे आणि न्यायालयात प्रलंबित तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँकांचे वसुली दावे, वित्तसंस्था तसेच दूरसंचार कंपनीची रक्कम वसुली प्रकरणे, पोलिसांची वाहतूक ई-चालनाबाबतची प्रकरणे ठेवण्यात आली होती. मोटार वाहन अपघात विमासंबंधी प्रकरणांमध्ये इन्शुरन्स कंपनीने ५० लाखांची भरपाई दिली. यात वकील व्ही. ए. कुंभार, एस. जी. दिवाण यांनी काम पाहिले. दुसऱ्या प्रकरणात इन्शुरन्स कंपनीने साडेआठ लाखांची भरपाई दिली. यात वकील एस. टी. माने, एस. एस. मदलापुरे यांनी काम पाहिले.

लोक अदालत यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीश, महाराष्ट्र राज्य बार कॉन्सिलचे सदस्य अण्णाराव पाटील, जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. विठ्ठल व्ही. देशपांडे, उपाध्यक्ष ॲड. किरणकुमार एस. किटेकर, सचिव ॲड. दौलत एस. दाताळ, महिला उपाध्यक्ष ॲड. संगीता एस. इंगळे, महिला सहसचिव सुचिता व्ही. कोंपले यांच्यासह इतर पदाधिकारी, जिल्हा सरकारी वकील ॲड. रांदड, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लाेक अदालतीत हे हाेते पॅनल प्रमुख लोक अदालतीसाठी जिल्ह्यात एकूण ४० पॅनलद्वारे कामकाज झाले. यामध्ये लातूर येथील पॅनलवर जिल्हा न्यायाधीश न्या. आर. बी. रोटे, न्या. जे. एम. दळवी, न्या. श्रीमती आर. एम. कदम, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. पी. बी. लोखंडे, न्या. एस. एन. भोसले, न्या. जे. सी. ढेंगळे, न्या. पी. टी. गोटे, न्या. के. जी. चौधरी, न्या. पी. एस. चांदगुडे, मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. जी. आर. ढेपे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आर. एच. झा, न्या. जे. जे. माने, न्या. एम. डी. सैंदाने, न्या. ए. एम. शिंदे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले.

यांनी पंच म्हणून काम पाहिले लोक अदालतीत ॲड. अभिजीत मगर, ॲड. एस. जी. केंद्रे, ॲड. सुमेधा शिंदे, ॲड. अजय कलशेट्टी, ॲड. काळे संतोष, ॲड. प्रशांत मारडकर, ॲड. छाया आकाते, ॲड. वर्षा स्वामी, ॲड. लता बदने, ॲड. कल्पना भुरे, ॲड. सचिन घाडगे यांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिले.

  

 

टॅग्स :laturलातूरCourtन्यायालय