शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद गट, गण पुनर्रचनेत राजकीय हस्तक्षेप?, राजकीय सोयीत विकासकामांचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 13:09 IST

पुनर्रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याने एका एका तालुक्यातील गट व गणाची पुनर्रचना दोन-तीन वेळा करण्यात आल्याची चर्चा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणाची पुनर्रचना पूर्ण झाली असून, तो मसुदा राज्य शासनाकडे पाठवला आहे. पुनर्रचनेत राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाल्याने एका एका तालुक्यातील गट व गणाची पुनर्रचना दोन-तीन वेळा करण्यात आल्याची चर्चा आहे. 

स्थानिक नेत्यांनी आपल्या सोयीनुसार गट व गणांची पुनर्रचना केल्याने भाैगोलिक संलग्नता धाब्यावर बसवल्याचे प्राथमिक चित्र आहे. येत्या आठ दिवसांत प्रशासनाच्या वतीने गट, गण जाहीर केले जाणार असून त्यानंतरच जिल्ह्यात प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरणार हे निश्चित आहे.स्थानिक राजकारणात ग्रामपंचायतप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायस समित्यांच्या निवडणुका लढवल्या जातात. स्थानिक गटाचे अस्तित्व या निवडणुकांवर अवलंबून असते. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. त्यामुळे स्थानिक नेतृत्वाच्या दृष्टीने ही निवडणूक तितकीच प्रतिष्ठेची असते. 

वास्तविक महसूल यंत्रणेने भौगोलिक संलग्नता पाहून गट व गणांची बांधणी करणे अपेक्षित असते. मात्र, दुर्दैवाने सॅटेलाईटवरून गट व गणांची बांधणी केल्याने अनेक ठिकाणी इच्छुकांपेक्षा नागरिकांच्या गैरसोयीचे गट झाले आहेत. सोशल मीडियातून गट व गट कळल्यानंतर राजकीय हस्तक्षेप वाढला. स्थानिक नेत्यांनी आपापल्या सोयीने पुनर्रचना केली आहे. संलग्नता न राहिल्याने त्याचा विकासकामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 

पुनर्रचनेचा प्रस्ताव शासन पातळीवर पाठवला आहे, त्यानंतर तो प्रसिध्द करून त्यावर हरकती घेतल्या जाणार आहेत. मात्र आतापर्यंतचा अनुभव पाहता, एकदा गट व गण तयार झाला आणि त्यानंतर कितीही हरकती घेतल्या तर फारस बदल करत नाहीत. त्यामुळे गट, गट जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात मोठा असंतोष पसरण्याची दाट शक्यता आहे.राजकीय सोयीत विकासकामांचा विसरराजकीय सोयीसाठी गावे इकडे तिकडे फेकली गेली असली तरी निवडणुकीनंतर नवीन सदस्यांना संपर्क ठेवणे मुश्कील होणार आहे. नागरिकांनी समस्या घेऊन ९ -१० किलो मीटर सदस्यांची घरी जावे लागणार आहे, या सगळ्याचा एकत्रित परिणाम विकासकामांवरही होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरZP Electionजिल्हा परिषद