शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलनास्त्र, क्रांतिदिनी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 16:26 IST

शासनाकडे प्रलंबित असलेल्या २२ मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनास्त्र बाहेर काढले आहे. क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) राज्यभरातील साडेतीन लाख कर्मचारी जिल्हा परिषद व पंचायत समितीसमोर एकदिवसीय उपोषण करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने प्रदेशाध्यक्ष बलराज मगर यांनी दिली. आचारसंहितेपूर्वी सकारात्मक निर्णय न झाल्यास कामकाज बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देराज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलनास्त्रबलराज मगर यांची माहिती : क्रांतिदिनी जिल्हा परिषद, पंचायत समितीसमोर उपोषण

कोल्हापूर : शासनाकडे प्रलंबित असलेल्या २२ मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनास्त्र बाहेर काढले आहे. क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) राज्यभरातील साडेतीन लाख कर्मचारी जिल्हा परिषद व पंचायत समितीसमोर एकदिवसीय उपोषण करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने प्रदेशाध्यक्ष बलराज मगर यांनी दिली. आचारसंहितेपूर्वी सकारात्मक निर्णय न झाल्यास कामकाज बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मगर यांनी पत्रकार बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी आरोग्य कर्मचारी संघटनेचे अरुण खरमाटे, सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, कार्याध्यक्ष एम. एम. पाटील, महावीर सोळांकुरे, संजय उपरे, नामदेव रेपे यांच्यासह युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते.मगर म्हणाले, मुख्यमंत्र्यांसह वित्त, ग्रामविकास, आरोग्य या विभागांतील मंत्री आणि सचिवांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही आश्वासनांपलीकडे २२ पैकी एकाही मागणीची पूर्तता झालेली नाही. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून गेल्या २ जुलैला जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन केले होते. तरीदेखील दखल न घेतल्याने येत्या ९ आॅगस्टला जिल्हा परिषद, पंचायत समितीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे उपोषण होणार आहे. यावेळी ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडू नये म्हणून सर्वजणांनी एकाच वेळी सहभागी होण्याऐवजी प्रातिनिधिक पातळीवर उपोषणास बसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ८ आॅगस्टला बैठकीसाठी बोलावण्याच्या हालचाली सुरू आहेत; पण २२ मागण्या मान्य होत नाहीत, तोवर आंदोलनाची सांगता होणार नाही.मागण्यामागील दाराने मंजूर केलेले वेतनश्रेणी त्रुटी प्रस्ताव रद्द करून चौकशी करावी.अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन लागू करावी.आरोग्य विभागातील कंत्राटी पद्धत बंद करावी.आरोग्य केंद्राचे खासगीकरण बंद करावे.समान काम, समान वेतन द्यावे.रिक्त पदे तातडीने भरावीत.----------------------------------- नसिम

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर