शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘झिरो पेडन्सी’ : अजित शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 18:05 IST

कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याच दिवशी कामाचा निपटारा करीत झिरो पेंडन्सीचा प्रयोग यशस्वी केला. हाच प्रयोग आता कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना व इतर १००० प्रकरणे त्याच दिवशी निकाली काढली जातील. शासनमान्यतेनंतर त्याच दिवशी हातात वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येईल, अशी माहिती प्रभारी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘झिरो पेडन्सी’ : अजित शिंदेकऱ्हाड कार्यालयानंतर कोल्हापुरात दुसरा उपक्रम

कोल्हापूर : कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याच दिवशी कामाचा निपटारा करीत झिरो पेंडन्सीचा प्रयोग यशस्वी केला. हाच प्रयोग आता कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना व इतर १००० प्रकरणे त्याच दिवशी निकाली काढली जातील. शासनमान्यतेनंतर त्याच दिवशी हातात वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येईल, अशी माहिती प्रभारी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.शिंदे हे सध्या कऱ्हाड कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. १ जूनपासून कोल्हापूर विभागाचा आरटीओ पदभार शिंदे यांच्याकडे आहे. कऱ्हाड कार्यालयात रोज १५० वाहन चालविण्याचे परवाने व इतर परिवहन कार्यालयांशी संबंधित कामे त्याच दिवशी पूर्ण करण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. हाच प्रयोग गेली काही दिवस कोल्हापुरात राबविण्यात येत आहे.

याविषयी माहिती देताना शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात मुख्य कार्यालय व शिबिरे अशी मिळून रोज किमान ५०० वाहन चालविण्याची प्रकरणे असतात. यासह परवाना नूतनीकरण, नवीन गाड्यांच्या नोंदणीची सुमारे ५०० कामे अशी एकूण १००० प्रकरणे असतात.

या सर्व कामांसाठी शासनाने ८ ते ३० दिवसांचा कालावधी ठरवून दिला आहे. ही प्रकरणे सुमारे आठ ते दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातातून जातात. झिरो पेंडन्सीचा अर्थ एका टेबलावरून पुढील टेबलावर एका दिवसात काम जाणे असा घेतला जातो. त्याहीपुढे जाऊन कऱ्हाड मध्ये वाहन परवान्यासह कार्यालयातील त्या-त्या दिवशीची प्रकरणे त्याच वेळी पूर्ण करण्याचा प्रयोग गेली तीन महिने राबविला. हाच प्रयोग आता कोल्हापुरात राबविला जाणार आहे.

सद्य:स्थितीत त्याच दिवशी वाहन चालविण्याचा परवाना तयार होईल. यानंतर तो स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल. पोस्टामुळे थोडा विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासनमान्यतेनंतर त्याच दिवशी थेट चालकाच्या हातात लायसेन्स देण्याची योजना आहे.

आॅनलाईन पेमेंटमुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून लायसेन्स टेस्ट ड्राईव्ह सुरू करता येईल. त्याचा फायदा विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांना होईल. शुल्क भरणा व वेळ निश्चितीकरण, आदी कामेही आॅनलाईनमुळे पारदर्शी झाली आहेत. यासह परवाना नूतनीकरणही त्याच दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी