शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

युवकच नवभारत घडवितील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास

By पोपट केशव पवार | Updated: December 1, 2023 16:49 IST

कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात ...

कोल्हापूर : देशात सध्या १८ ते २८ या वयोगटातील तरुणाईंची संख्या सर्वाधिक आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पेनेत तरुणाईला मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे हे युवकच येणारा नवभारत घडवतील, असा विश्वास गाेव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 'आत्मनिर्भर भारत: युवकांचा सहभाग' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. सावंत बोलत होते. कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना आम्ही पूर्णत्वास नेली आहे. दुध, भाजीपाल्यासाठी गोवा पूर्णपणे महाराष्ट्र व कर्नाटकवर अवलूबन होते. हेच अवलंबित्व कमी करण्यासाठी गावागावात जाऊन नागरिकांची गरज, अपेक्षा जाणून घेतल्या. आपण काय करू शकतो, सरकार काय देऊ शकते याचा अभ्यास करून त्यादृष्टीने योजना आखल्या. त्याच्या अंमलबजावणीसाठी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना गावे नेमून दिली. हर घर नल, प्रत्येक घरी गॅस, शौचालय, वीज दिली. याची गावागावात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने गोवा आज स्वयंपूर्ण झाले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्राने जलयुक्त शिवार योजना प्रभावी राबवून २२ हजार गावे पाणीदार केली आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा, पिकांना हमीभाव यामुळे शेतकऱ्याचा मार्ग सुकर होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात थेरीपेक्षा प्रॅक्टिलला महत्व दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपण जे शिकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. प्रभावी योजनांद्वारे अवलंबित्व कमी केलेसरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण युवा, स्वयंपूर्ण जेल, ग्रीन स्कूल अशा संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणल्या. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ई-बाजार सुरु केला. यामुळे गोव्यातील नागरिकांना आज दुसऱ्यावर अवलंबून राहवे लागत नसल्याचे डॉ. सावंत म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPramod Sawantप्रमोद सावंत