शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

तरुणाचा गोळ्या झाडून खून

By admin | Updated: February 23, 2015 00:18 IST

तलवारीचेही वार : भरदिवसा चौघांकडून हल्ला; मिरजेत अनैतिक संबंधातून घटना

मिरज : अनैतिक संबंधाच्या कारणावरून मिरजेत अक्रम मुख्तार शेख (वय २६, रा. तानाजी चौक) या तरुणाचा गावठी पिस्तुलाने गोळ्या झाडून व तलवारीने वार करून खून करण्यात आला. मृत अक्रमचा मित्र अमीर पठाण, मोजेस व त्याच्यासह चौघांनी कॅरम क्लबमध्ये बसलेल्या अक्रम याचा निर्घृण खून करून पलायन केले. रविवारी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे मिरजेत खळबळ उडाली होती. रविवारी दुपारी एक वाजता मंगळवार पेठेतील आर्या बेकरीजवळ अल-नूर इमारतीच्या तळघरातील कॅरम क्लबमध्ये अक्रम शेख या तरुणाचा गोळ्या झाडून व तलवारीने डोक्यात वार करून अमीर पठाण व त्याच्या साथीदारांनी खून केला. अक्रम याच्या बरगडीत पिस्तुलाची एक गोळी घुसली. त्याच्या डोक्यात, चेहऱ्यावर, मानेवर, हातावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. रक्ताच्या थारोळ्यात अक्रम कोसळल्यानंतर अमीर पठाण व त्याच्या साथीदारांनी तेथून पलायन केले. अक्रम शेख याच्या कॅरम क्लबमध्ये काम करणाऱ्या मोहसीन बेग याच्यासमोरच हल्लेखोरांनी अक्रमचा खून केला. मोहसीन याने आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी आला. हल्लेखोरांनी पिस्तुलातून झाडलेली एक पुंगळी पोलिसांना घटनास्थळी सापडली. अमीर पठाण याने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, तर त्याचा साथीदार मोजेस याने तलवारीने सपासप वार केले. त्यांच्यासोबत आणखी दोन साथीदार होते. रविवारी दुपारी अक्रम दुचाकी (एमएच १०, बीएस ५१७)वरून मोहसीन बेग याच्यासोबत कॅरम क्लबमध्ये आला. त्याठिकाणी बसल्यानंतर त्याच्या पाळतीवर असलेल्या अमीर पठाण याने साथीदारांसोबत हल्ला चढविला. संशयित अमीर पठाण याचा भाऊ सलीम पठाण याने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर अक्रम शेख याचे सलीमच्या घटस्फोटीत पत्नीशी सूत जुळले होते. अक्रमचे भावाच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध अमीरला मान्य नव्हते. या रागातून त्याने अक्रमची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गावठी पिस्तुलातून अक्रमवर गोळ्या झाडण्यात आल्या असून, आरोपींना पकडून खुनाचे नेमके कारण शोधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी मोहसीन बेग (रा. कमान वेस) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. अमीर पठाण याच्यासह चौघांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कॅरम क्लबमधील तिसरा खूनमिरजेत कॅरम क्लबमध्ये यापूर्वी दोन खून झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या कॅरम क्लबमध्ये गुन्हेगारांची ऊठबस व तरुणांची मोठी गर्दी असते. कॅरम क्लबमधून जुगार, मटका, खासगी सावकारी असे अनेक अवैध उद्योग सुरू असतात. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कॅरम क्लबवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याने शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे.पंधरा दिवसांपूर्वीच खुनाचा कटअक्रम व अमीर दोघेही मित्र असून, अमीर पठाणचा कॅरम क्लब तीन महिन्यांपूर्वी अक्रम शेखने चालविण्यास घेतला होता. भावाच्या घटस्फोटित पत्नीशी अक्रमचे अनैतिक संबंधाचा राग असल्याने अमीरने पंधरा दिवसांपूर्वीच अक्रमच्या खुनाचा कट रचला होता. तलवार आणून त्यावर अक्रम नाव लिहिले होते.अक्रमला संपविणार असल्याचे काही जवळच्या मित्रांनाही सांगितले होते; मात्र अक्रमला त्याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता.मृत अक्रम व संशयित अमीर सावकारी व्यवसाय करीत होते. अक्रमविरुद्ध सहा महिन्यांपूर्वी सावकारी रकमेच्या वसुलीसाठी एकाला मारहाण व धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला होता. अक्रम, अमीर व सलीम यांची मैत्री होती. ए. के. ग्रुप नावाने डिजिटल फलक झळकावणाऱ्या अक्रम शेख, अमीर पठाण यांची मंगळवार पेठ परिसरात दहशत होती.पोलिसांचा सौम्य लाठीमारखुनाचे वृत्त समजताच परिसरातील तरुणांची घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली. यामुळे मंगळवार पेठ ते गांधी चौकापर्यंत वाहतूक ठप्प झाली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले. अक्रमच्या मृतदेहाचे शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. अक्रमच्या डाव्या बरगडीत एक गोळी घुसल्याचे आढळले. कॅरम क्लबशेजारी डॉल्बी सुरू असल्याने गोळ्यांचा आवाज क्लबबाहेर आला नाही. मोहसीन बेगने बाहेर येऊन आरडाओरडा केल्यानंतर गर्दी जमली.