शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

झेंडू लागवडीतून हमखास नफा

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

पिकाच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी १५० कि. ग्रॅ. नत्र, ६० कि.गॅॅ्र. स्फुरद व ६० कि.ग्रॅ. पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या अगोदर द्यावे.

मच्छिंद्र मगदूम-- सांगरुळ झेंडूचे दर्जेदार उत्पादन मिळवायचे असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाने लागवड करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये सुधारित जातींचा वापर, उत्तम प्रतीच्या बियाण्यांची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, हेक्टरी झाडांची संख्या व आंतरमशागत याकडे लक्ष द्यावे, असे जाणकारांचे मत आहे. झेंडूची लागवड करीत असताना योग्य, पाण्याचा निचरा होईल अशी जमीन निवडावी. जमीन नांगरून छोटे छोटे वाफे तयार करून झेंडूची लागवड करता येते. तसेच खरीप हंगामात सरी वरंब्यावर (बोदावर) लागवड करावी. उन्हाळ्यात व रब्बी हंगामात उंच, सफाट वाफ्यावर लागवड करावी. लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी. पुनर्लागवड शक्यतो दुपारी करावी. रोपांची लागवड करताना समान अंतर ठेवून बोदाच्या माथ्यावर रोप लावावे. यामुळे रोपे कोलमडून खाली पडणार नाहीत. तसेच पुनर्लागवड केल्यास हलकेसे पाणी लगेच द्यावे. एक एकर क्षेत्रासाठी साधारण २०० ते ३०० ग्रॅम बियाणे लागते, तर रब्बी हंगामासाठी १५० ते २०० ग्रॅम बियाणे लागते. बियाण्यास बीजप्रक्रिया केलेली नसल्यास दोन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.झाडांच्या भरघोस वाढीसाठी व अधिक उत्पन्नासाठी जातीनुसार अंतर ठेवावे. दोन ओळींमध्ये ४५ सें.मी. किंवा ३० किंवा २० सें.मी. अंतर ठेवावे व दोन रोपांमध्ये ३० ते १० सें.मी. अंतर ठेवावे. दरम्यान, झेंडूचे झाड अतिशय जोमाने वाढत असल्यास झेंडूच्या झाडाला नत्र, स्फुरद व पालाश खताची गरज असते. या पिकाच्या अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी १५० कि. ग्रॅ. नत्र, ६० कि.गॅॅ्र. स्फुरद व ६० कि.ग्रॅ. पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या अगोदर द्यावे. नंतर नत्राचे चार हफ्ते करावेत व दर्जेदार फुलांसाठी एक टक्का युरियाची फवारणी घ्यावी, तर तीन ते चार वेळा चांगली खुरपणी करावी. झेंडूसाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे असून पाण्याची पाळी जमिनीच्या प्रकारानुसार व हंगामानुसार द्यावी. तसेच पाण्याचा ताण बसणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशा पद्धतीने पिकाची काळजी घेतल्यास झेंडू लागवडीतून चांगले उत्पादन येऊन त्यातून शेतकऱ्याला चांगला नफा मिळू शकतो.झेंडूच्या सुधारित जाती झेंडूच्या पिकात फूलधारणा ही प्रकाशाचा कालावधी व उपलब्ध तापमान यावर अवलंबून असते. यामुळे लागवडीसाठी जातीची निवड करताना विविध गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. हंगामानुसार पुढीलप्रमाणे सुधारित जातींची निवड करावी. रब्बी हंगाम : पुसा नारंगी गेंदा, पुसा बसंती गेंदा, टायगर इन्का हायब्रीड (आॅरेंज व यलो)उन्हाळी हंगाम : कॅ्रकर जॅक व लोकल४खरीप हंगाम : आफ्रिकन जायंट टॉल, यलो, कॅलकट्टीया जाफरी (यलो व आॅरेंज) लाडू गेंदा