शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३५७ जागा, आले ९२; निवडले १५ जण; कोल्हापुरात रोजगार मेळाव्याकडे तरुणांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:26 IST

कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजन

कोल्हापूर : एकीकडे रोजगार नसल्याची ओरड सुरू असताना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करूनही अनेक तरुण त्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र कोल्हापुरात गुरुवारी पाहायला मिळाले. जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ६ कंपन्यांमध्ये ३५७ जागा रिक्त होत्या. यामध्ये ९२ उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखत दिली. यामध्ये ६२ जणांची प्राथमिक, तर १५ जणांची अंतिम निवड करण्यात आली. जिल्ह्यातील ६ कंपन्यांमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, टेक्निशियन, हेल्पर, सीएनसी ऑपरेटर, साइट सुपरवायझर, फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह अशा विविध पदांच्या जागा रिक्त होत्या. यासाठी हा रोजगार मेळावा घेण्यात आला. यासाठी आठवी ते एमबीएपर्यंत शैक्षणिक पात्रता होती. सदर बाजार परिसरातील जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात कंपनीच्या प्रतिनिधींकडून या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, रिक्त जागा जास्त असल्या तरी कंपन्यांना कौशल्याधारित उमेदवारांची गरज असते. मात्र, असे उमेदवार मिळत नसल्याने जागा रिक्त राहत आहेत. जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याला तुलनेने अधिक प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी सांगितले.मोठ्या शहराचे फॅडकोल्हापूर जिल्ह्यात आयटीआयची प्रत्येक तालुक्यात शासकीय कॉलेज आहेत. शिवाय कोल्हापूर शहरातही तीन हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयटीआय कॉलेज आहे. येथून प्रत्येकवर्षी हजारो विद्यार्थी कौशल्याची पदवी घेऊन बाहेर पडतात. मात्र, या विद्यार्थ्यांना कोल्हापूरपेक्षा पुणे किंवा मुंबई येथील कंपन्या अधिक खुणावतात. कोल्हापूरपेक्षा अधिक पगार या शहरांमध्ये मिळतो, त्यामुळे हे विद्यार्थी कोल्हापूरच्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास तितकेसे उत्सुक नसल्याचे दिसते. त्यामुळे येथील कंपन्यांना कौशल्याधारित विद्यार्थी मिळत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjobनोकरी