शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

युवकाला सात वर्षांची सक्तमजुरी

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

कसब्यातील बलात्कार प्रकरण

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या युवकाला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे गतवर्षी हा प्रकार घडला होता. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. बी. डेबडवार यांनी शुक्रवारी हे आदेश दिले. अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) या कायद्यानुसार पाच हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.आरोपी फहाद मुस्ताक पाठणकर (वय २३, नायरी संगमेश्वर) याने ५ आॅगस्ट २०१४ रोजी एस.टी. बसने कसबा येथे शाळेत जात असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. तिला दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरविले. त्यानंतर ७ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री रत्नागिरी येथील एस. टी. स्टँडनजीकच्या परिसरातील एका फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम ३६३, ३६६ (अ) आणि ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एम. आर. चिखले यांनी केला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. बी. डेबडवार यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता विनय गांधी यांनी दहा साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश यांनी शुक्रवारी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (वार्ताहर)