शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

पेडअप एफएसआयवर ५० टक्के सवलत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:02 IST

Real Estate Kolhapur-अतिरिक्त चटई निर्देशांक (पेडअप एफएसआय) मंजूर करताना आकारण्यात येणाऱ्या अधिमुल्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्यशानाने घेतला. कोल्हापुरात महापालिकेने निश्चित केलेला दर ३५ टक्के असून नव्या निर्णयामुळे त्यामध्ये निम्मी सवलत मिळू शकते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांनाच या सवलतीचा लाभ होईल, असे बांधकाम क्षेत्राला वाटते.

ठळक मुद्देपेडअप एफएसआयवर ५० टक्के सवलत मिळणार राज्य शासनाचा निर्णय : कोल्हापूरला फारसा लाभ नाही

कोल्हापूर : अतिरिक्त चटई निर्देशांक (पेडअप एफएसआय) मंजूर करताना आकारण्यात येणाऱ्या अधिमुल्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्यशानाने घेतला. कोल्हापुरात महापालिकेने निश्चित केलेला दर ३५ टक्के असून नव्या निर्णयामुळे त्यामध्ये निम्मी सवलत मिळू शकते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांनाच या सवलतीचा लाभ होईल, असे बांधकाम क्षेत्राला वाटते.अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करताना आकारण्यात येणारे अधिमूल्य हे शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीच्या मर्यादित स्थानिक महापालिका आकारतात. एकात्मिक बांधकाम नियमावली लागू केल्यापासून हा दर सर्वच महापालिकांसाठी ३५ टक्के निश्चित करण्यात आला आहे. त्याशिवाय जिने, पॅसेजेस, कपाटाचा भाग, बाल्कनी हे जे अतिरिक्त बांधकाम होते, त्यासाठी रेडिरेकनरच्या १० टक्के रक्कम आकारण्यात येत होती. आता नव्या निर्णयानुसार या दोन्ही म्हणजे ४५ टक्के कराची जी रक्कम होईल त्याच्या ५० टक्के सवलत मिळणार आहे.पेडअप एफएसआयची रक्कम भरल्याशिवाय बांधकाम परवाना मिळत नाही. कोणत्याही प्रकल्पाच्या सुरुवातीलाच बांधकाम व्यावसायिकांकडे आर्थिक देयता कमी असते. त्यामुळे या रक्कम कशा कमी करता येतील अशी मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे व्यवहार ठप्प असताना बांधकाम व्यावसायिकांकडून झाली होती. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

परंतु या निर्णयाची दूसरी बाजू अशी आहे की जो विकासक या सवलतीचा लाभ घेईल त्याने ती मालमत्ता विकताना ग्राहकाचे मुद्रांक शुल्काची रक्कम भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यायचा की नाही हे विकासकाला ऐच्छिक आहे.

मुंबईसारख्या मोठ्या शहरात तीन ते चार प्रकारचे प्रिमियम असतात. रेडिरेकनरचा दरही तिथे जास्त असतो. त्यामुळे तेथील विकासकाला हा निर्णय फायदेशीर ठरेल. कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्राला त्याचा फारसा लाभ होईल असे वाटत नाही. विशेष म्हणजे हा निर्णय ऐच्छिक आहे.विद्यानंद बेडेकरअध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगkolhapurकोल्हापूर