शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक, महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त पदी बदली

By उद्धव गोडसे | Updated: May 22, 2025 18:43 IST

उद्धव गोडसे कोल्हापूर : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त पदी बदली झाली. त्यांच्या जागी नांदेड ...

उद्धव गोडसेकोल्हापूर : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त पदी बदली झाली. त्यांच्या जागी नांदेड येथील मानवी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची नियुक्ती झाली. गुप्ता हे सध्या हैदराबाद येथील प्रशिक्षणात असून, लवकरच ते कोल्हापूर पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. राज्यातील २२ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचा आदेश गृह विभागाने गुरुवारी (दि. २२) जारी केला.योगेश गुप्ता हे २०१२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशिक्षणानंतर मुंबई, हिंगोली, परभणी येथे त्यांनी सेवा बजावली. मुंबईत जलद कृती दलाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर नांदेड येथे नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते. सध्या ते हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. ते लवकरच कोल्हापूर अधीक्षक पदाचा कार्यभार घेणार आहेत. लोकाभिमुख काम करून पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मे २०२३ मध्ये कोल्हापूरचा कार्यभार स्वीकारला होता. गेल्या दोन वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याचे काम त्यांनी केले. शहरातील जातीय दंगलीसह विशाळगड येथील दंगल काळात त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासह सराईत गुन्हेगारांना तडीपार, हद्दपार करणे आणि पोलिस दलातील प्रशासकीय कामांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. नूतन अधीक्षक गुप्ता कोल्हापुरात हजर झाल्यानंतर पंडित ठाणे येथील उपआयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसTransferबदली