शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

CoronaVirus In Kolhapur : माझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 10:51 IST

CoronaVirus In Kolhapur : छोटी मृन्मयी अवघ्या चार वर्षांची आहे. आईशिवाय एक क्षण तिचा कधी गेला नाही. गेले दोन दिवस तिने बाबांसह सर्वांना भंडावून सोडले आहे. ती एकच विचारणा करते आहे, माझी मम्मा कुठे आहे हो, मला दाखवा.. या तिच्या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही. कारण तिच्या मम्माला क्रूर नियतीने हिरावून नेले आहे. कोरोना काळ बनून आला व एक उमलते आयुष्य तो कुस्करून गेला. कुणाचेही मन गलबलून टाकावी अशी ही घटना आरे (ता. करवीर) येथे घडली.

ठळक मुद्देमाझी मम्मा कुठं आहे हो, मला दाखवा; छोट्याची हृदय हेलावणारी विचारणा वयाच्या तिशीतच उमलते आयुष्य कोमेजले

कोल्हापूर : छोटी मृन्मयी अवघ्या चार वर्षांची आहे. आईशिवाय एक क्षण तिचा कधी गेला नाही. गेले दोन दिवस तिने बाबांसह सर्वांना भंडावून सोडले आहे. ती एकच विचारणा करते आहे, माझी मम्मा कुठे आहे हो, मला दाखवा.. या तिच्या प्रश्नाचे उत्तर आज कुणाकडेच नाही. कारण तिच्या मम्माला क्रूर नियतीने हिरावून नेले आहे. कोरोना काळ बनून आला व एक उमलते आयुष्य तो कुस्करून गेला. कुणाचेही मन गलबलून टाकावी अशी ही घटना आरे (ता. करवीर) येथे घडली.कोरोनाचा संसर्ग तरुणांना तितकासा धोकादायक नाही हा समज खोटा ठरवणारी ही घटना आहे. ऋतुजा शैलेश पाटील (वय ३०, रा. आरे, ता. करवीर) यांचे कोरोनामुळे सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये निधन झाले. ऋतुजा ही दत्त आसुर्ले-पोर्ले कारखान्याचे संस्थापक संचालक असलेले दिवंगत दिनकर बळवंत पाटील (रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) यांची नात व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांची नात्याने भाची. परंतु, त्यांनी तिला मुलीसारखे वाढवलेलं.. तिचे लग्न २०१४ ला आरे (ता. करवीर) येथील शैलेश पाटील यांच्याशी झाले.

गावचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांचा तो मुलगा. एम.टेक झालेला. त्याला दोन वर्षांपूर्वी अदानी ग्रुपमध्ये अहमदाबादला नोकरी मिळाली. एक कुटुंब सुखाने डोलू लागलं. चार वर्षांपूर्वी त्यांना कन्या झाली. सगळे कसे आनंदात आयुष्य चालले होते. एप्रिलमध्ये कोरोनाच्या लाटेत शैलेशला प्रथम संसर्ग झाला. त्याने ऋतुजाचीही तपासणी करून घेतली.

ती पॉझिटिव्ह आली. परंतु, प्रकृती एकदम चांगली होती. तपासण्या, औषधोपचार व्यवस्थित सुरू होते. गेल्या शनिवारपासून तिला श्वास घ्यायला जास्त त्रास सुरू झाला. रविवारी सायंकाळी ती फोनवर कुटुंबीयांशी बोलली. परंतु, रात्रीत असे काय घडले आणि सोमवारी (दि. ३ मे) सकाळी तरी सगळं संपले. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. तिथेच अंत्यसंस्कार करून बुधवारी आरे येथे रक्षाविसर्जन करण्यात आले. सुट्टीला येतो असे सांगून गेलेली ऋतुजा आता न परतीच्या वाटेने निघून गेली. खरंच नियतीही इतकी निष्ठूर का वागत असेल..? 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर